North Sentinel Island : भारतातील ‘या’ रहस्यमयी बेटावर जायला घाबरतात लोक; काय असेल कारण?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (North Sentinel Island) संपूर्ण जगभरात रहस्यमयी आणि गुदमयी गोष्टी खूप आहेत. मात्र त्याबद्दल आपल्याला माहित असेलच असं नाही. आपल्या देशातही अशाच काही पुरातन, प्राचीन वास्तू तसेच ठिकाणे आहेत. जी दिसायला सुंदर असली तरीही त्यांच्या सौंदर्यात दडलेली रहस्य फारच रोमांचकारी आहेत. त्यापैकी एका रहस्यमयी बेटाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. ते बेट म्हणजे अंदमान निकोबारमधील नॉर्थ सेंटीनल बेट. हे बेट न केवळ देशासाठी तर संपूर्ण जगासाठी एक रहस्य ठरले आहे. चला तर या बेटाविषयी काही महत्वाची माहिती घेऊया.

नॉर्थ सेंटीनल बेट (North Sentinel Island)

नॉर्थ सेंटीनल बेट हे संपूर्ण जगासाठी एक रहस्यमयी ठिकाण ठरले आहे. या बेटावर राहणाऱ्या विशिष्ट आदीवासी जमातीतील लोक संपूर्ण जगापासून अलिप्त आहेत आणि त्यांचा जगाशी काहीच संबंध नाही. मुख्य म्हणजे कुणी त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर ते संबंधित व्यक्तीचा खात्मा करतात. त्यामुळे लोक इथे जायलाच घाबरतात. अमेरिकन नागरिकांच्या हत्येमुळे अंदमान निकोबार बेटं चर्चेत आली होती. मात्र, हे बेट त्याच्या १४५ वर्ष जुन्या एका रहस्यासाठी ओळखले जाते.

.. आणि तो जीवानिशी गेला

अंदमान आणि निकोबार बेटसमूहातील नॉर्थ सेंटिनल द्वीप हे अत्यंत शांत, सुंदर असे बेट आहे. मात्र या शांततेत दडलेलं भयावह रहस्य लोकांना इथे जाण्यापासून अडवते. नॉर्थ सेंटीनल बेटं कितीही आकर्षक असले तरीही या बेटांवर जाण्यास संपूर्णपणे बंदी आहे. असं म्हणतात, इथे गेलेला माणूस आजपर्यंत कधीच परत आलेला नाही. (North Sentinel Island) खूप वर्षांपूर्वी एका २७ वर्षीय अमेरिकन नागरिक जॉन अॅलनसोबत असं घडलं होत. ख्रिस्ती धर्माच्या प्रचारासाठी जॉन अॅलन इथे स्थायिक असलेल्या आदिवासी लोकांना भेटायला गेला होता.

त्याचा पहिला प्रयत्न फसल्यानंतर त्याने ५ मच्छिमारांसह पुन्हा या बेटांवर येऊन प्रसार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने भेटवस्तूसुद्धा आणल्या होत्या. पण त्याच काहीही ऐकून न घेता इथल्या आदिवासींनी त्याला बाण मारून ठार केले. त्याचा मृतदेह सुद्धा समुद्र किनारी वाळूत पुरून टाकला, असे म्हटले जाते. (North Sentinel Island) या बेटांवर जाण्याआधी जॉनने त्याच्या कुटुंबियांसाठी एक चिट्ठी लिहीली होती. ज्यात त्याने लिहिलं होत, ‘मी वेडा आहे असा तुमचा समज होऊ शकतो. पण इथल्या लोकांना जीजसबाबत सांगणं गैर होणार नाही असं मला वाटतं. मला ठार केलं तर आदिवांसींवर राग काढू नका, पण हे देवा मी मरू इच्छित नाही’.

इथे जाण्यास सक्त मनाई

नॉर्थ सेंटीनल बेट हे राजधानी पोर्ट ब्लेअरपासून केवळ ५० किलोमीटर दूर आहेत. अतिशय सुंदर आणि शांत असे हे बेट पर्यटकांना फार आकर्षित करते. पण तरीसुद्धा या बेटांवर जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. कारण या बेटांवर राहणाऱ्या आदिवासींना जगाशी संबंध ठेवायला आवडत नाही. या आदिवासींना सेंटीनल आदिवासी म्हटलं जातं. (North Sentinel Island) त्यांचा आजवर कोणत्याही मानवी समुहाशी संपर्क आलेला नाही आणि त्यांना कुणाशी संबंध ठेवायचा देखील नाही. इथे फक्त १०० आदिवासी राहतात, असे म्हटले जाते. पण त्यांना मानवी जगाशी संबंध ठेवण्यात कोणतीही रुची नाही. जर कुणी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर ते त्याला जीवानिशी मारतात.

१४५ वर्ष जुनं रहस्य

या बेटावरील सेंटीनल आदिवासी मानवी जगाला घाबरतात. यामागे एक विशिष्ट कारण आहे. त्यांच्या भीतीचा संबंध थेट इंग्रजांशी जोडलेला आहे. हे रहस्य १४५ वर्ष जुनं आहे. माहितीनुसार, १८७९ मध्ये ब्रिटीश नौदल अधिकारी मॉरिस विडाल पोर्टमन यांना अंदमानचे प्रभारी अधिकारी बनवण्यात आला होता. त्याने १८८० मध्ये या बेटावरील काही लोकांना प्रयोगासाठी नेले होते. (North Sentinel Island) त्यावेळी हे लोकल बेटावर परतले असता एक विचित्र प्रकारचा संसर्ग पसरला आणि याची बाधा झाल्याने अनेकांचं मृत्यू झाला. त्यामुळे या बेटावरील आदिवासी घाबरले आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण जगाशी संबंध तोडून टाकला. हेच कारण आहे की, कुणी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर हल्ला करून हे लोक त्यांना जीवानिशी मारतात.