कोरोना नाही तर ‘यामुळे’ भारतात मागील ४ वर्षांत ५६ हजार २७१ जणांचा मृत्यू, रोज ४२ मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१६ ते २०१९ या काळात देशातील रेल्वे रुळांवर एकूण ५६,२७१ लोकांचा मृत्यू झाला आहे,तर या चार वर्षांच्या कालावधीत ५,९३८ लोक जखमी झाले आहेत. माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मिळाली आहे. परंतु, रेल्वे रुळावर हे लोक कसे मरण पावले याविषयी आरटीआयच्या उत्तरात काही विशिष्ट माहिती देण्यात आलेली नाहीये. मध्य प्रदेशातील नीमच येथील रहिवासी असलेले आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी मंगळवारी माहितीच्या अधिकाराखाली रेल्वे बोर्डाकडून माहिती प्राप्त केली आहे की २०१६ साली रेल्वेमार्गावर १४०३२, २०१७ मध्ये १२८३८, २०१८ मध्ये १४१९७ आणि २०१९ मध्ये १५२०४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

आकडेवारीचे विश्लेषण असे दर्शविते की गेल्या वर्षी २०१९ मध्ये दररोज सरासरी सुमारे ४२ लोकांचा मृत्यू रेल्वेच्या रुळावर झाला.आरटीआय उत्तरानुसार, २०१६ मध्ये १३४३,२०१७ मध्ये १३७६, २०१८ मध्ये १७०१ आणि २०१९ मध्ये १५१८ एवढे लोक रेल्वे रुळावर जखमी झालेत.

Turnaround man

गौर यांना माहिती अधिकार कायदा २००५ अन्वये पाठविलेल्या पत्रात रेल्वे बोर्डाने म्हटले आहे की राज्यांच्या राज्य रेल्वे पोलिसां कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रेल्वे बोर्डाच्या सुरक्षा संचालनालयाला हा डेटा सादर करण्यात आला आहे.

रेल्वे रुळांवर पोलिसिंग करणे ही राज्य सरकारची बाब असल्याचेही या पत्रात म्हटले आहे. म्हणूनच, रेल्वे आवारात आणि फिरत्या गाड्यांमधील गुन्हेगारी रोखणे आणि तपासणी करणे ही जीआरपीमार्फत सोडण्यात येणाऱ्या राज्यांचीही जबाबदारी आहे.

रेल्वे बोर्डाला उत्तर देताना आरटीआय कार्यकर्त्याने म्हटले आहे की देशातील रेल्वे रुळांवर दरवर्षी मोठ्या संख्येने लोक मरण पावलेल्या आणि जखमी झाल्याची सरकारी आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. रेल्वेने जीआरपी आणि राज्य सरकारच्या इतर विभागांच्या मदतीने रुळांवरील धोकादायक भागात ओळख पटवून देण्यासाठी अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न अधिक तीव्र केले पाहिजेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment