भीक मागून स्वातंत्र्य नाही अवॉर्ड मिळतात!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 1947 साली स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 साली मिळालं असं वक्तव्य तिने केलं होतं. यावर आता महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटरवरुन प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भीक मागून स्वातंत्र्य नाही अवॉर्ड मिळतात असं महाराष्ट्र काँग्रेसने म्हटलं आहे.

एका मुलाखतीत कंगना रनौत हिनं स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका प्रश्नाचं उत्तर देताना कंगना म्हणाली की, ‘स्वातंत्र्य जर भीक म्हणून मिळालं असेल तर ते स्वातंत्र्य असेल का? सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस या लोकांबाबत बोलायचं झाल्यास, या सर्वांना माहित होतं की रक्त सांडलं तर हे लक्षात ठेवावं लागेल की हे आपल्या भारतीयांचं नसेल. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हतं. भीक होती. खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं. ‘

दरम्यान कंगनाच्या वक्तव्याचा वरुण गांधी यांनी समाचार घेतलाय. ट्विट करत वरुण गांधी यांनी कंगनावर निशाणा साधलाय. वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, ‘कधी महात्मा गांधी यांच्या त्याग आणि तपस्येचा अपमान, कधी त्यांच्या खुन्याचा सन्मान. आता शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाष चंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार. या विचारांना वेडेपणा म्हणू की देशद्रोह?’

 

Leave a Comment