Nothing Phone 1 : Nothing ब्रँड चा पहिला स्मार्टफोन घालणार धुमाकूळ; पहा फिचर्स आणि किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्याच्या युगात मोबाईल (Nothing Phone 1) हि काळाची गरज असून भारतातही मोबाईलचे दिवाने काही कमी नाहीत. नवनवीन मोबाईल खरेदीकडे नेहमीच भारतीयांचा कल राहिला आहे. याच पार्श्वभूमीवर Nothing ब्रँडने आपला पहिला स्मार्टफोन Nothing Phone – 1 आज रात्री 8:30 ला लाँच होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल प्रेमी या फोनची वाट पाहत होते. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची वैशिष्टये आणि किंमत…

मोबाईल display- (Nothing Phone 1)

Nothing Phone १ मध्ये सेल्फी कॅमेर्‍यासाठी समोरील बाजूस पंच-होल कटआउटसह 6.55-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. या मोबाईल फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G+ चिपसेट असेल. याशिवाय 120Hz रिफ्रेश रेट सह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असेल.

Nothing Phone 1

कसा असेल कॅमेरा-

मोबाईलच्या कॅमेरा (Nothing Phone 1) बाबत बोलायचं झालं तर Nothing Phone 1 ला 50MP चा बॅक कॅमेरा आहे. 16MPचा सेकेंडरी अल्ट्रा-वाइड-एंगल अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा मिळेल. तर सेल्फी कॅमेरा हा सुद्धा 16MP चा आहे.

Nothing Phone 1

4500mAh ची दमदार बॅटरी-

Nothing फोन1 मध्ये 33W Fast Charging सहित 4,500mAh ची मोबाईल बॅटरी आहे. तसेच या फोनमध्ये (Nothing Phone 1) 45W वायर्ड चार्जिंगचा देखील समावेश आहे. मात्र त्यासाठी वेगळा चार्जर खरेदी करावा लागेल.

Nothing Phone 1

काय असेल किंमत-

मोबाईलच्या (Nothing Phone 1) किमतीबाबत बोलायचं झालं तर, स्टोरेज प्रकारानुसार या फोनची किंमत रु. 27,000 ते रु. 3७,000 पर्यंत असेल. 8GB + 128GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 31000 असेल. 8GB + 256GB ची किंमत 32000 आणि 12GB + 256GB ची किंमत 36000 असू शकते.

OnePlus 10T लवकरच होणार लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत

TVS Ronin 225 : बुलेटला टक्कर देणार TVS ची Ronin 225; पहा वैशिष्ट्ये आणि किंमत

Whatsapp ने आणले नवे फीचर्स; 2 दिवसांपूर्वीचा मेसेजही डिलीट करता येणार

Smartphone घेताय जरा थांबा !!! 20 हजार रुपयांखालील हे सर्वोत्कृष्ट 5G स्मार्टफोन पहा

BSNL च्या ग्राहकांना धक्का ! कंपनीने या 3 प्रीपेड प्लॅनमध्ये केला मोठा बदल

Leave a Comment