हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात गेल्या काही दिवसांपासून नवनवीन मोबाईल लाँच होत आहेत. मोबाईल निर्माता कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली असून त्यामुळे ग्राहकांना जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी सर्वच कंपन्या परवडणाऱ्या किमतीत आणि अपडेटेड फीचर्स सह मोबाईल बाजारात आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नुकताच Nothing Phone 2a हा स्मार्टफोन देशात लाँच झाला आहे. इतर कंपन्यांच्या मोबाईल पेक्षा Nothing Phone 2a ची डिजाइन खूपच हटके आणि युनिक अशी आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊयात…
6.7-इंचाचा डिस्प्ले –
Nothing Phone 2a स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.7-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचा पिक्सल रिझोल्युशन 1,080×2,412 असून या मध्ये 1300 nits इतका पीक ब्राइटनेस आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 7200 Pro प्रोसेसर दिला असून हा स्मार्टफोन Android 14 आधारित NothingOS 2.5 वर काम करतो. खास गोष्ट म्हणजे लिक्विड कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे, त्यामुळे कितीही वेळ मोबाईलचा वापर केला तरी हा स्मार्टफोन गरम होत नाही.
50MP कॅमेरा – Nothing Phone 2a
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Nothing Phone 2a मध्ये पाठीमागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP मुख्य कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. तर समोरील बाजूला 32MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर साठी या स्मार्टफोन साठी 5000mAh बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत किती?
कंपनीने Nothing Phone 2a एकूण ३ व्हेरिएन्ट मध्ये लॉन्च केला आहे. त्यानुसार मोबाईलच्या किमती सुद्धा वेगवेगळ्या आहेत. यातील 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएन्ट ची किंमत 23,999 रुपये आहे. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 25,999 रुपये आहे. आणि 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या मोबाईलची 27,999 रुपये आहे. येत्या 12 मार्च फ्लिपकार्टवर हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध होईल. तुम्ही हा स्मार्टफोन पांढऱ्या, मिल्की आणि काळ्या रंगात खरेदी करू शकता.