औरंगाबाद – शहरातील विश्वासनगर लेबर कॉलनी येथील शासकीय सेवा अनेक वर्षांपासून राहणाऱ्या कर्मचारी/ कर्मचारी यांचे नातेवाईक यांनी आपण राहत असलेल्या निवासस्थानाच्या बाबतीचे आपले किंवा आपल्या कर्मचारी नातेवाईकांचे कागदपत्रे पुरावे 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात स्वत: वयक्तिकरित्या सादर करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्तात एक नोटीस लावण्यात आली आहे.
दिलासा देण्याचा प्रयत्न करू- पालकमंत्री
काल जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांना लेबर कॉलनीतील रहिवाशांनी भेट दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी रहिवाशांच्या प्रश्नावर विचार करू. चर्चेतून जे मुद्दे समोर आले, त्यावर विचार केला जाईल. या प्रकरणी कायदेशीर कारवाई होईल. कोर्टाचा जो निकाल असेल त्यातून रहिवाशांना काय दिलासा देता येईल, हे पाहिले जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी विविध राजकीय पक्षांसह जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्यासह मनपा अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.