औरंगाबाद | शहरातील टीव्ही सेंटर भारत माता क्रीडांगण जवळील दोन उंच (ईएसआर) पाण्याच्या टाक्याच्या फुटीगंचे काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय संतप्त झाले असून, यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 1680 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून या योजनेअंतर्गत टीव्ही सेंटरच्या भारत माता क्रीडांगणाच्या दक्षिणेला सुरू असलेल्या दोन उंच (ईएसआर) पाण्याच्या टाक्यांच्या पायाभरणीचे फुटींगचे काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने संतप्त झालेल्या महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महानगरपालिका च्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
पाणी पुरवठा व पाणीपुरवठा योजनेसंदर्भात सोमवारी, २ ऑगस्ट रोजी आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता एस.डी .पानझडे यांनी दिली. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी काल शहरातील विविध कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी चिश्चिया कॉलनी येथे भेट दिली. तेथील रस्त्याची व ड्रेनेज ची पाहणी केली. माजी नगरसेवक अंजू नाईकवाडी यांनी त्यांच्या वार्डातील मातीच्या रस्ते ऐवजी काँक्रीट रस्त्याची मागणी केली. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मनपा आयुक्त बंगला जवळील टाकीच्या फुटींगच्या कामाची पाहणी करून टीव्ही सेंटर येथील भारत माता क्रीडांगण च्या दक्षिणेस 1680 कोटी रुपयेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या दोन उंच (ईएसआर) टाक्याच्या पायाभरणीच्या कामाची पाहणी केली.
पायाभरणीचे फुटिंगचे काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने संतप्त झालेल्या मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सदरील कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कडक शब्दात खडसावून निकृष्ट दर्जाचे काम खपून घेणार नाही, असा इशारा दिला. सदरील कामाची मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी गंभीर दखल घेतली असून सहा बाय सहा च्या क्यूबमध्ये स्ट्रेंथ तपासणीसाठी काँक्रीटचे नमुने घेतली असून पायाभरणीचे फुटींगचे काम सुरू असताना कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कामासंदर्भात आयुक्तांनी कडक शब्दात सुनावले असून जीवन प्राधिकरणाच्या व महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही कडक शब्दात पत्र देऊन समज देण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त यांनी शहर अभियंता एस.डी .पानझडे यांना दिले आहेत.