आता ‘या’ कामांसाठी लागणार नाही Aadhaar, सरकारने नवीन अधिसूचना केली जारी, त्याविषयी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आधार कार्ड (Aadhaar card) संदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. काही कामांसाठी सरकारने अनिवार्य नियमांमधून आधार काढून टाकला आहे. आता यापुढे पेंशनधारकांना जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी आधार कार्ड दाखविणे बंधनकारक राहणार नाही. या नवीन नियमांमध्ये केंद्र सरकारने (Central government) या जबाबदारितून सूट दिली आहे. मेसेजिंग सोल्यूशन संदेश (Sandes) आणि सरकारी कार्यालयांच्या बायोमेट्रिक्स अटेंडेंस सिस्टममध्येही आधार नंबरची अनिवार्यता दूर केली गेली आहे.

‘हे’ नियम बदलले आहेत
आता या नव्या नियमांनुसार जीवन प्रमाणपत्रासाठी (Life Certificate) आधारची अनिवार्यता संपली आहे. हे सक्ती वरून ऐच्छिक असे बदलण्यात आले आहे. म्हणजेच, जर यापुढे कोणत्याही निवृत्तीवेतनधारकांना हवे असेल तर ते आधारबद्दल माहिती देऊ शकतील किंवा जर ते त्यांना नको असेल तर ते देणार नाहीत. हा नियम ऐच्छिक असल्याने पेन्शनधारकांची मोठी समस्या सुटली आहे. निवृत्तीवेतनाधारकांना प्रत्येक वर्षाच्या सुरूवातीस लाइफ सर्टिफिकेट जमा करायचे असते. जोपर्यंत पेन्शनधारकाच्या आधार कार्डामध्ये दिलेली बायोमेट्रिक माहिती अपडेट केली जात नाही किंवा इतर काही तांत्रिक समस्या उद्भवत नाही तोपर्यंत हे अधिक कठीण होते. तथापि, आता त्यांना बराच दिलासा मिळणार आहे

संदेश अ‍ॅपसाठी देखील आधारची गरज नाही
त्याचबरोबर, शासकीय कार्यालयात हजेरी लावण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या Sandes साठी आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य वरून ऐच्छिक केले गेले आहे. Sandes हे एक इन्स्टंट मेसेजिंग सोल्यूशन अ‍ॅप आहे जे सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचार्‍यांच्या हजेरी साठी डिझाइन केले हेलेले आहे. आता सरकारी कर्मचार्‍यांना फक्त Sandes च्या माध्यमातूनच हजेरी लावावी लागते.

अधिसूचना म्हणजे काय ?
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने 18 मार्च रोजी एक अधिसूचना जारी केली आहे. त्यात असे नमूद केले गेले आहे की, आता लाइफ प्रूफसाठी आधारचे प्रमाणीकरण ऐच्छिक आधारावर असेल आणि त्या वापरणार्‍या संस्थांनी लाईफ सर्टिफिकेट देण्याचे पर्यायी मार्ग शोधले पाहिजेत. या प्रकरणात एनआयसीला आधार कायदा 2016, आधार नियमन 2016 आणि कार्यालय ज्ञापन आणि युआयडीएआय (UIDAI) ने वेळोवेळी जारी केलेली सकुर्लर आणि मार्गदर्शक तत्त्वे यांचे पालन करावे लागेल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

Leave a Comment