हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : उर्जा मंत्री राज कुमार सिंह यांनी शुक्रवारी ग्राम उजाला योजना लाँच केली. या योजनेअंतर्गत केवळ 10 रुपयांत एलईडी बल्ब मिळणार आहेत. सरकारचा ग्रामीण भारतातील अंधार दूर करणं हा या योजनेचा उद्देश आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ही योजना कंवर्जेंस एनर्जी सर्विसेज लिमिटेडतर्फे (CESL) लाँच करण्यात आली आहे.
या अंतर्गत CESL पहिल्या टप्प्यात 1.5 कोटी बल्ब उपलब्ध करुन देणार आहे. ही सरकारी कंपनी जगातील सर्वात कमी दरातील एलईडी बल्ब विकत आहे. ही EESL (Energy Efficiency Services Ltd) ची संपूर्ण मालकीची सहाय्यक कंपनी आहे. EESL भारत सरकारची एनर्जी कंपनी आहे, जी जगातील सर्वात मोठी एनर्जी सर्विस कंपनी आहे. याची 100 टक्के भागीदारी भारत सरकारकडे आहे.
ग्राम उजाला प्रोग्रामअंतर्गत पहिल्या टप्प्यात 7 आणि 12 वॅटचे LED bulbs उपलब्ध होणार आहेत. पहिल्या टप्प्यात बिहारच्या आग्रा, उत्तर प्रदेशातील वाराणसी, आंध्र प्रदेशातील विजयवाडा, महाराष्ट्रातील नागपूर आणि पश्चिम गुजरातमधील काही जिल्ह्यात बल्ब उपलब्ध होणार आहेत. या बल्बची वॉरंटी तीन वर्षांची असेल आणि हे बल्ब केवळ ग्रामीण भारतात उपलब्ध करण्यात येणार आहेत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group