नवी दिल्ली । देशाची बँकिंग व्यवस्था सातत्याने सुधारत आहे. बँकेशी संबंधित सर्व कामे क्षणार्धात केली जात आहेत. पैसे जमा करणे किंवा काढणे किंवा कर्ज घेणे, हे आता खूप सोपे झाले आहे. देशातील आघाडीची सरकारी बँक पंजाब नॅशनल बँकेने एक पाऊल पुढे टाकत कर्ज प्रक्रिया अतिशय सुलभ केली आहे.
तुम्हीही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल आणि आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला पैशांची गरज असेल तर बँक तुमच्यासाठी 8 लाख रुपयांपर्यंतच्या इन्स्टा लोनची सुविधा देत आहे.
लोनसाठी कसा अर्ज करावा ?
पंजाब नॅशनल बँक (PNB) आपल्या ग्राहकांना 8 लाखांपर्यंतच्या Insta लोनचा लाभ देत आहे. जर तुम्हाला लोन हवे असेल तर हे लोन फक्त मोबाईल नंबर आणि आधार नंबरद्वारेच मिळेल. पीएनबीने ट्विट करून इन्स्टा लोनची माहिती दिली आहे.
पंजाब नॅशनल बँकेने सांगितले की, आता बँकेकडून लोन घेणे जेवण ऑर्डर करण्याइतके सोपे झाले आहे. तुम्ही कमी व्याजदरासह पर्सनल लोन शोधत असाल, तर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेकडून इन्स्टा लोनसाठी अर्ज करू शकता. जास्त माहितीसाठी, तुम्ही http://tinyurl.com/t3u6dcnd या लिंकवर क्लिक करून वेबसाइटला भेट देऊ शकता. याशिवाय तुम्ही http://istaloans.pnbindia.in ला देखील भेट देऊ शकता.
लोन कोण घेऊ शकते ?
पंजाब नॅशनल बँकेच्या इन्स्टा लोनचा लाभ घेण्यासाठी तुम्ही केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा PSU कर्मचारी असणे आवश्यक आहे. जर तुम्ही यापैकी काही असाल तर तुम्हाला काही मिनिटांत लोन मिळेल. या लोन ची सुविधा 24X7 उपलब्ध आहे. विशेष म्हणजे इन्स्टा लोनची प्रोसेसिंग फी झिरो आहे.
IPPB ने शुल्क वाढवले ?
1 जानेवारीपासून इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) मध्ये 10,000 रुपयांपेक्षा जास्त डिपॉझिट्ससाठी आणि काढण्यासाठी, तुम्हाला वेगळे शुल्क भरावे लागेल. याआधी, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने 01 ऑगस्ट 2021 पासून आपले डोअरस्टेप बँकिंग शुल्क बदलले होते, जे प्रति ट्रान्सझॅक्शन 20 रुपये होते.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ग्राहकांना 3 प्रकारचे सेव्हिंग अकाउंट अर्व्हिस देते. या बचत खात्यांचे स्वतःचे नियम आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, तुम्ही सर्व पेमेंट बँक खात्यांमध्ये 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे ठेवू शकत नाही, परंतु तुम्ही पोस्ट ऑफिस बँकेत खाते उघडू शकता जिथे 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर केली जाऊ शकते.