आता क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे प्रतिसरकार लढा उभारणे गरजेचे; बाळासाहेब थोरातांची केंद्रावर टीका

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

आता क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे प्रतिसरकार लढा उभारणे गरजेचे असल्याची भावना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थाेरात यांनी व्यक्त करत केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या व्यर्थ न हो बलिदान या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, सोनल चौहान, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, अँड. उदयसिंह पाटील, रणजितसिंह देशमुख यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, सध्या बाेलण्याच्या स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. ईडी काेणाला माहिती नव्हती ती आता लहान पाेराला देखील माहिती झाली आहे. शेतक-यांवर हाेणारा अन्याय दूर व्हावा यासाठी लाखाे शेतकरी दिल्लीत धडकले पण काेणालाच त्याची फिकीर नाही. आता क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे प्रतिसरकार लढा उभारणे गरजेचे आहे.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील केंद्रातील मोदी सरकारवर देखील टीका केली. भाजपाला काँग्रेसचा राग आहे. असे म्हणत भाजपने पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो घेतला नाही, म्हणजे भाजपाला किती राग आहे ते दिसून येते. अशी टीका नाना पाटोले यांनी केली तसेच महाराष्ट्रात ६५ टक्के लोकांनी विकत घेऊन लस घेतली आहे असेही नाना पटोले यांनी म्हंटल

सातारा जिल्ह्यातील वडूज येथील तहसील कार्यालयावर ब्रिटिश सरकार विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी नऊ सप्टेंबर १९४२ मध्ये मोर्चा काढला होता. हा मोर्चा दडपवण्यासाठी ब्रिटिशांनी बेछूट गोळीबार केला होता. त्यात नऊ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. यामध्ये २४ जण गंभीर जखमी झाले होते. आज या घटनेला ७९ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील वडूज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित व्यर्थ न हो बलिदान हा कार्यक्रम आयोजित केला होता.

You might also like