औरंगाबाद : शहरामध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याने शहरातील वेगवेगळ्या भागात चौकाचौकांमध्ये पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस अधिकारी सुद्धा आता रस्त्यावरती उभा राहून वाहने घडवताना दिसून येत आहेत.
जर आपल्याला कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडायचे असेल तर आपण मास्क लावणे बंधनकारक असेल. शहरांमध्ये जागोजागी निर्बंध आहेत. ब्रेक द चेनचे नियम प्रशासनाकडून शितील करण्यात आलेली आहे. मात्र खरेदी-विक्रीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठांमध्ये येताना दिसून येत आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी नागरीक नियम पाळताना नागरिक दिसून येत नाहीत.
पण काही दिवसापासून चोरीचे आणि गुन्हांचे प्रमाण जास्त वाढले आहे. कोरोनामुळे तसेच चोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांनी दुचाकीस्वाराचा थांबवून दुचाकी चालकाचे ओळखपत्र तसेच दुचाकीचे कागदपत्रे तपासण्यात येत आहे यामध्ये जर कोणी संशयित आढळला तर त्याला ताब्यात घेण्यात येते आहे. तसेच विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना दंड ठोठावण्यात येत आहे.