नवी दिल्ली । खासगी क्षेत्रातील बँक एक्सिस बँकेने अलीकडेच त्यांच्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या बचत खात्यांमध्ये ठेवण्याच्या किमान रकमेची मर्यादा बँकेने वाढवली आहे. बँकेने फ्री कॅश ट्रान्सझॅक्शनची संख्याही कमी केली आहे. बँकेचे हे नवे नियम 1 एप्रिलपासून ग्राहकांसाठी लागू झाले आहेत.
बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो आणि मोठ्या शहरांमधील सुलभ बचत आणि अशा इतर खात्यांमध्ये किमान 12,000 रुपये ठेवावे लागतील. यापूर्वी ही रक्कम 10,000 रुपये होती. हा बदल फक्त त्या योजनांमध्येच लागू होईल, ज्यांच्या खात्यात सरासरी मिनिमम बॅलन्स 10,000 रुपये ठेवण्याची तरतूद आहे. याचा अर्थ असा की हा नवा नियम झिरो बॅलन्स असलेल्या खात्यांना आणि मिनिमम बॅलन्स असलेल्या इतर खात्यांना लागू होणार नाही. बँकेच्या म्हणण्यानुसार, सरासरी मिनिमम बॅलन्स मधील नवे बदल घरगुती आणि NRI ग्राहकांना लागू आहेत.
कॅश ट्रान्सझॅक्शन लिमिट कमी
एक्सिस बँक इझी सेव्हिंग्ज आणि अशा इतर योजनांमध्ये मंथली फ्री कॅश ट्रान्सझॅक्शन लिमिट 2 लाख रुपयांवरून 1.5 लाख रुपये करण्यात आली आहे. आतापर्यंत, एक्सिस बँक आपल्या ग्राहकांना दरमहा 2 लाख रुपयांचे 4 फ्री कॅश ट्रान्सझॅक्शन देत होती. आता कोणतेही शुल्क न भरता केवळ 1.5 लाख-1.5 लाख रुपये महिन्यातून चार वेळा काढता येतील. मात्र, नॉन-होम आणि थर्ड पार्टी कॅश मर्यादेत कोणताही बदल नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. एक्सिस बँकेने सांगितले की, मिनिमम बॅलन्स आणि कॅश ट्रान्सझॅक्शनशी संबंधित नियमांमधील हे बदल 1 एप्रिल 2022 पासून लागू झाले आहेत.
जवळपास सर्व बँकांच्या बचत खातेधारकांनी त्यांच्या खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे आवश्यक आहे. जे ग्राहक मिनिमम बॅलन्स राखत नाहीत त्यांच्याकडून जवळपास सर्वच बँका दंड आकारतात. ही मिनिमम बॅलन्सची अट प्रत्येक बँकेनुसार बदलते आणि सामान्यतः भौगोलिक स्थाने आणि खात्याच्या प्रकारावर आधारित असते.