आता देशभरात इन्स्टॉल केले जाणार 50 हजारांहून जास्त चार्जिंग स्टेशन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हीरो इलेक्ट्रिकने येत्या एका वर्षांत 50,000 ईवी चार्जिंग स्टेशन बनवण्यासाठी बोल्ट बरोबर पार्टनरशिप केली आहे. या पार्टनरशिप अंतर्गत देशभरात हीरो इलेक्ट्रिकचे सुमारे 750 टच पॉइंट्स इन्स्टॉल केले जाणार आहेत. तसेच सुमारे 2,000 हीरो इलेक्ट्रिक राइडर्स आपल्या घरीच इन्स्टॉल केलेल्या बोल्ट चार्जिंग यूनिट्सद्वारे फ्री मध्ये चार्जिंगचा लाभ घेऊ शकतील.

हीरो इलेक्ट्रिकचे एंटरप्राइझेस पार्टनर्स आणि ईवी ग्राहक या बोल्ट चार्जिंग नेटवर्क चा लाभ घेऊ शकतील. या पार्टनरशिप द्वारे हीरो इलेक्ट्रिक ऍप आणि वेबसाइट द्वारे चार्जिंग स्टेशन सर्च करणे, स्लॉट बुक करणे आणि पेमेंट करणे आणखी सोपे होणार आहे. हे बोल्ट चार्जिंग स्टेशन इन्स्टॉल केल्यानंतर ते चालविण्यासाठी खासगी- सार्वजनिक मोड निवडू शकाल. सध्या ग्राहक कमर्शियल/ईवी तारीफ आधारावर किंमती निवडू शकतात. याशिवाय हीरो इलेक्ट्रिक स्कूटर यूझरसाठी सब्सक्रिप्सन स्कीम देखील सुरु केली जाईल.

हिरो इलेक्ट्रिकचे सीईओ सोहिंदर गिल यांनी आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की, “आमचे ध्येय कार्बन-फ्री मोबिलिटीला प्रोत्साहन देणे आहे. याद्वारे ग्राहकांना चांगल्या ईव्ही प्रवासाचा अनुभव देण्यासाठी एक मजबूत चार्जिंग नेटवर्क तयार करणे आहे. या पार्टनरशिपमुळे लाखो हिरो इलेक्ट्रिक ग्राहकांचा प्रवास सुकर होईल. तसेच ऑन-डिमांड चार्जरमुळे, रेंजची चिंता देखील दूर होईल. कारण आम्ही पुढील 2 वर्षांत 1 मिलियनहून जास्त चार्जिंग पॉइंट्स इन्स्टॉल करू.

आता चार्जिंग स्टेशन शोधणे, बुकिंग करणे आणि पेमेंट करणे यासाठी ग्राहक हिरो इलेक्ट्रिक ऍप वापरू शकतील. देशभरातील ईव्ही युझर्सना परवडणारे चार्जिंग नेटवर्क देण्यासाठी हिरो इलेक्ट्रिक देशव्यापी चार्जिंग नेटवर्क सेट करणार आहे.

Leave a Comment