आता पुणे PMT धावणार ‘ह्या’ नवीन पद्धतीने ; 200 मार्गांचा आहे समावेश

PMPML Bus (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे शहरात सुरु झालेली मेट्रोस नागरिक चांगलाच प्रतिसाद देताना दिसून येत आहेत. त्यामुळे PMT  चा वापर कमी होऊ नये ह्यासाठी PMT च्या अधिकाऱ्यांनी नवीन शक्कल लढवत प्रवाश्यांना आकर्षित करण्यासाठी नॉन – स्टॉप बसची सुविधा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे ही नॉन स्टॉप बस सेवा? 

पीएमपीएमएलने अलीकडेच पीएमआरडीएच्या हद्दीतील अतिरिक्त मार्ग ओळखण्यासाठी सर्वेक्षण केले असल्याने नॉन-स्टॉप बस सेवेचा विस्तार वेगाने होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पीएमपीएमएल आता नॉन-स्टॉप सेवेचा अधिकाधिक मार्गांवर विस्तार करण्याचा विचार करत आहे. सध्या,अधिकारी विस्तारासाठी सुमारे 200 मार्गांचे मूल्यांकन करत आहेत. परिवहन विभागाने पीएमआरडीए क्षेत्रामध्ये लांब पल्ल्याच्या प्रवासाची सोय करण्यावर लक्ष केंद्रित करून आश्वासन दर्शविणारे 20 मार्ग आधीच सुरु केले आहेत. मेट्रोला फिडर सर्व्हिस जोडल्यामुळे लोकांचा वेळ वाचत आहे. त्यामुळे बस विना कंडक्टर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड मार्गे धावणार बस

पिंपरी चिंचवड हे PMT बससाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथूनच 200 मार्गांवर बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ह्यामुळे प्रवाश्यांचा 20 ते 25 मिनिटे वेळ वाचणार आहे.

नवीन प्रणालीमुळे वाढणार नाहीत बसचे तिकीट

PMT बसने घेतलेल्या निर्णयामुळे बसमध्ये कंडक्टर नसणार आहे. त्यासाठी आता चालकच तिकीट घेणार आहे. ह्यामध्ये तुम्हाला वाताणाकुलीत बसचा आनंद घेता येणार आहे. ह्या सर्व सुविधेमुळे बसचे तिकीट वाढेल का असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच तर त्याच उत्तर नाही असं आहे. ह्या नवीन प्रणालीमुळे नागरिकांचा ह्यास चांगला प्रतिसाद मिळेल अशी अशा व्यक्त केली जात आहे.

सध्या कोणत्या मार्गांने धावत आहेत बस

सध्या पुणे महानगरपालिका ते भोसरी अशी नॉन स्टॉप बस सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी 200 मार्गांची निवड करण्यात आली आहे. पीएमपीएमएलच्या सीएमडीच्या नेतृत्वाखालील या उपक्रमाचा उद्देश पीएमआरडीए हद्दीतील विस्तारित मार्गावरील प्रवाशांचा प्रवास वेळ कमी करणे हा आहे.

जलद गतिमुळे वाचेल प्रवाशांचा वेळ – सतीश गाटे 

हे लक्षात घेण्यासारखे आहे की ही सेवा सुरुवातीला चार मार्गांवर सुरू करण्यात आली होती.  पीएमपीएमएलचे जनसंपर्क अधिकारी सतीश गाटे म्हणाले, ”नागरिकांच्या प्रतिसादाचे मूल्यांकन केल्यानंतर आणि निवडलेल्या मार्गांना अंतिम रूप दिल्यानंतरच ही सेवा सुरू होईल. शिवाय, सेवा सुरू झाल्यानंतरही तिकिटांच्या किमती कायम राहतील आणि जलद सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल.”