पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकार करणार मोठी घोषणा ! पेन्शन वाढीबाबत लवकरच घेतला निर्णय जाणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्र सरकार आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांना खुशखबर देण्याच्या तयारीत आहे. वास्तविक, केंद्र सरकार लवकरच PF खातेधारकांच्या किमान पेन्शनच्या रकमेत वाढ करू शकते. EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची (CBT) लवकरच बैठक होणार आहे. यामध्ये अनेक मोठ्या मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेतला जाऊ शकतो. पेन्शनच्या किमान रकमेत वाढ करण्याबाबत निर्णय घेणे हा या बैठकीचा मुख्य अजेंडा आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय कामगार संघटनांनी किमान पेन्शन 1,000 रुपयांवरून 6,000 रुपये करण्याची मागणी केली आहे. असे मानले जाते की,सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी हे 3,000 रुपयांपर्यंत करू शकते. EPFO चा पैसा खाजगी कॉर्पोरेट बाँडमध्ये गुंतवण्याच्या वादग्रस्त मुद्द्यावरही बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच, 2021-22 या आर्थिक वर्षासाठी पेन्शन फंडाच्या व्याजदरावरही निर्णय घेतला जाऊ शकतो.

CBT बैठकीचे मुद्दे आणि अजेंडा तयार केला जात आहे
CBT किमान पेन्शन वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. EPF मध्ये जमा केलेल्या रकमेवर सध्याचा 8.5 टक्के व्याजदर कायम राहू शकतो, असे मानले जात आहे. सध्याच्या व्याजदरात कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे. CBT ची बैठक आधी 16 नोव्हेंबरला होणार होती, मात्र नंतर ती पुढे ढकलण्यात आली. बैठकीचे मुद्दे आणि अजेंडा अद्याप तयार झालेला नाही.

व्याज वाढविण्याची शिफारस मागील बैठकीत करण्यात आली होती
CBT ची शेवटची बैठक मार्च 2021 मध्ये श्रीनगरमध्ये झाली होती. CBT ने 2020-21 साठी सभासदांच्या खात्यांमध्ये EPF ठेवींवर वार्षिक 8.5 टक्के व्याजदराची शिफारस केली होती. त्याला अर्थ मंत्रालयाने नुकतीच मान्यता दिली आहे.

Leave a Comment