औरंगाबाद : महाराष्ट्रभर आता पोलीस नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक बदलणार असल्याची माहित सूत्रांनी दिली आहे. येत्या काही काळात ११२ हा क्रमांक पोलीस नियंत्रण कक्षाचा असल्याचे समजत आहे.१०० ऐवजी ११२ हा क्रमांक संपूर्ण महारष्ट्रासाठी असेल.
औरंगाबाद शहरात २० व्हॅन आणि ८० मोटारसायकल यात समाविष्ट होणार आहेत. वयोवृद्ध नागरिक, पीडित महिला, टवाळखोर तसेच कौटुंबिक वाद यावर कारवाही करण्यासाठी हा क्रमांक १०० या क्रमांकासारखाच असेल.
दरम्यान, या क्रमांकामुळे सर्वांना आपत्कालीन काळात जलद गतीने मदत होईल असे सूत्रांकडून कळत आहे. तब्बल १० मिनिटात पोलिसांची मदत मिळणार आहे. याबाबतचा एक फोटो सुद्धा प्रसिद्ध झाला आहे.