औरंगाबाद | बारावीचा निकालाची कधी लागेल याची सर्वांना प्रतीक्षा आहे. अशात शाळा महाविद्यालयांनी बोर्डाच्या संगणकीय प्रणालीवर बारावीचे मूल्यांकन ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बोर्डाकडून आता निकालाच्या पुढील प्रक्रिया सुरू आहेत. त्यासाठी पुढील दोन दिवस लागणार आहेत. म्हणून या महिन्याच्या अखेरीस निकाल लागण्याची शक्यता आहे.
मूल्यांकनाचे काम 99.94 टक्के पूर्ण झाले आहे. औरंगाबाद विभागीय मंडळातील 1 लाख 46 हजार 705 विद्यार्थ्यांचे तर लातूर विभागीय मंडळातील 78 हजार 32 विद्यार्थ्यांचे निकाल ऑनलाईन भरले गेले आहेत. त्रुटीची पूर्तता, दुरुस्त्या नंतर मराठवाड्यातील 2 लाख 24 हजार 737 विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागली आहे.
शाळांचे काम संपले असून आता बोर्डाचे काम सुरू आहे. त्याला दोन-तीन दिवस लागतील. 30 जुलैपर्यंत किंवा 31 जुलै पर्यंत निकाल लागेल. मात्र निकाल कधी लागेल हे राज्य मंडळाकडून जाहीर होईल तोपर्यंत निश्चित सांगता येणार नाही.