आता घरबसल्या पॅन कार्डमधील चुका कशा दुरुस्त कराव्यात हे समजून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली I पर्मनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. पॅन कार्ड भारतीय टॅक्स डिपार्टमेंटद्वारे जारी केले जाते. पॅन कार्डमध्ये 10 अंकी युनिक अल्फान्यूमेरिक नंबर असतो. पॅन कार्डचा वापर केवळ टॅक्स संबंधित कारणांसाठीच नाही तर ओळखीचा पुरावा म्हणूनही केला जातो. काही वेळा त्यात काही चुका असतात ज्या सुधारल्या नाहीत तर समस्या निर्माण होतात.

आजकाल पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पॅन कार्डमध्ये काही त्रुटी असल्यास ते आधार कार्डशी लिंक करता येणार नाही. कारण, पॅन आणि आधारमध्ये नाव आणि जन्मतारीख एकच असावी. आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे.

तुमच्या पॅन कार्डमध्ये काही चूक असल्यास आणि ती सुधारायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. आता तुम्ही घर बसल्या पॅनमधील चुका दुरुस्त करू शकता. पॅन कार्डमधील जन्मतारीख किंवा नावात अनेकदा चुका आढळून आल्या आहेत. या चुका तुम्ही स्वतः दुरुस्त करू शकता.

तुमचे पॅन कार्ड कसे दुरुस्त करावे ?

पॅन कार्डमध्ये छापलेल्या जन्मतारीख किंवा नावातील चूक सुधारण्यासाठी, पहिले तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html या टॅक्स इन्फर्मेशन नेटवर्कला भेट द्यावी लागेल.

येथे Application Type वर जा आणि तेथे दिसणार्‍या Changes or Correction in existing PAN Data/Reprint of PAN Card या पर्यायावर क्लिक करा.

येथे तुमच्याकडून जी काही माहिती विचारली जाते ती भरा आणि योग्य कॅप्चा कोड टाकून सबमिट करा. यानंतर तुम्हाला आधार, पासपोर्ट किंवा इतर डॉक्युमेंट अपलोड करावी लागतील. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यास सांगितले जाईल.

पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँक रेफरन्स नंबर आणि ट्रान्सझॅक्शन नंबर मिळेल. ते सेव्ह करा आणि नंतर Continue वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये तुम्हाला पॅन कार्डची चूक सांगावी लागेल. फक्त ही सर्व आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करा. काही दिवसात तुम्हाला तुमचे पॅन कार्ड दुरुस्त करून मिळेल.

पॅन कार्डशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी, तुम्ही NSDL शी हेल्पलाइन क्रमांक 1800-180-1961 आणि 020-27218080 वर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या [email protected]आणि [email protected] या ई-मेल आयडीवर देखील लिहू शकता.

Leave a Comment