Monday, March 20, 2023

आता पोस्ट ऑफिस मधून बुक करू शकता रेल्वेचे तिकीट

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि तेवढीच आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस (Post office) मध्ये सुद्धा ट्रेनचे तिकीट बुक करू शकता. यामुळे रेल्वे स्टेशनच्या काऊंटर वर प्रवाशांची गर्दी होणार नाही.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन म्हणजे आयआरसीटीसी (IRCTC) ही योजना सुरु करत आहे. रेल्वे आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) 6 जानेवारीला उत्तर प्रदेशच्या 9147 पोस्ट ऑफिसमधून रेल्वे रिझर्वेशन तिकीट जारी करण्याची योजना सुरु करतील.

- Advertisement -

6 जानेवारीपासूनच सर्व राज्यांच्या सर्व बँच पोस्ट ऑफिसपर्यंत ग्रामीण पोस्ट सेवक म्हणजे जीडीएस (Gramin Dak Sevaks) प्रवाशांसाठी ट्रेन रिझर्वेशन तिकीट बनवू शकतील. दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी 75 वंदे मातरम ट्रेन चालवण्यात येतील. त्यासाठी टेंडर प्रक्रिया देखील सुरू झाली असून आत्तापर्यंत 9 कंपन्यानी याबाबत आपली इच्छा व्यक्त केली आहे