नवी दिल्ली । कॅशलेस किंवा डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी मोदी सरकारकडून जोरदार प्रचार करण्यात आलेल्या ‘भीम’ ऍप सध्या वादात सापडलं आहे. या ऍपचा डाटा लीक झाल्याचा दावा एका इस्रायली सायबर सिक्युरिटी फर्मनं केला होता. ‘व्हीपीएन मेन्टॉर’ या सायबर सिक्युरिटी फर्मनं केलेल्या दाव्यानुसार, भारतातील भीम ऍप वापरणाऱ्या ७२.६ लाख युझर्सचा डाटा लीक झाला आहे. परंतु, भारत सरकारकडून मात्र हा दावा फेटाळण्यात आला आहे. ‘भीम’ वापरकर्त्यांचा डाटा कोणत्याही प्रकारे लीक झालेला नाही असं सांगत भारतानं इस्रायली संस्थेचा दावा खोडून काढला आहे. ‘भीम’ ऍप सुरक्षित असल्याचं नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या भारत सरकारच्या संस्थेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दरम्यान, ‘व्हीपीएन मेन्टॉर’च्या दाव्यानुसार या ऍप युझर्सची महत्त्वाची माहिती लीक झाली आहे. या माहितीत युझर्सच नाव, जन्मतारीख, वय, लिंग, घराचा पत्ता, आधारकार्ड अशा संवेदनशील माहितीचा समावेश आहे. याचा फटाक संपूर्ण भारतातील लोकांना बसू शकतो. याचा फायदा उचलत हॅकर्स आणि सायबर गुन्हेगार फसवणूक, चोरी आणि सायबर हल्लेही करू शकतात, असा दावा व्हीपीएननं केला होता.
‘भीम’ ऍपचा डाटा लीक झाला असल्याच्या काही बातम्या समोर येताच भीमऍप युझर्सच्या डेटा सुरक्षितेबाबत तडजोड करत नाही. त्यामुळे अशा खोट्या बातम्यांपासून नागरिकांनी सावध राहावं, असं स्पष्टीकरण भारत सरकारकडून देण्यात आलं हवे. ‘एनपीसीआय अत्यंत उच्च दर्जाचे सुरक्षा तंत्रज्ञान वापरते आणि युझर्सच्या डेटा सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. पेमेंटची अत्याधुनिक सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि पुढेही राहू’ असंही सरांकडून सांगण्यात आलं आहे.
केंद्र सरकारच्या संयुक्त सहकार्यानं ‘सीएससी – ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस’ या कंपनीनं ‘भीम’ हे ऍप तयार केलं. नोटबंदीनंतरच्या काळात मोदी सरकारकडून राबवण्यात आलेल्या ‘डिजिटल भारत’ या संकल्पनेला उभारी देताना मोदी सरकारनं या ऍपचा प्रचार केला होता. परंतु, या ऍपमधील महत्त्वाचा डाटा हा ‘अमेझॉन वेब सर्व्हिसेस एस-३ बकेट’मध्ये सेव्ह झाल्याचा दावा इस्त्रायली फर्मनं केला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”