NPS New Rule Update | NPS योजनेत नवीन नियमाची भर,1 एप्रिलपासून ग्राहकांना पैसे काढण्यासाठी करावे लागणार ‘हे’ काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

NPS New Rule Update | आपल्याकडे नॅशनल पेन्शन योजना चालू आहे. या योजनेचा लाभ देखील अनेक लोक घेऊ आहेत.परंतु आता या योजनांमध्ये मोठा बदल होणार आहे. आणि या योजनांची या बदलांची सुरुवात 1 एप्रिलपासून होणार आहे. त्यामुळे आता हा कोणता नियम आहे? ज्यात मोठा बदल झालेला आहे. याची आपण सविस्तर माहिती आज घेणार आहोत.

पेन्शन फंड नियामक PFRDA नॅशनल पेन्शन सिस्टमच्या संबंधित निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे आता तुम्हाला खात्यातून पैसे काढायचे असेल तर त्यासाठी सगळ्यात आधी तुमच्या आधार कार्डची पडताळणी होणार आहे. आणि त्यानंतरच तुम्हाला तुमच्या खात्यातून पैसे काढता येणार आहेत.

हा नवीन नियम 1 एप्रिल पासून लागू होणार | NPS New Rule Update

नुकतेच या नियमाबाबत माहिती देणारे एक परिपत्रक जारी केलेले आहे. नॅशनल पेन्शन योजनेच्या सदस्यांचे हित लक्षात घेऊनच सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी प्रणालीमध्ये लॉगिन करण्यासाठी आता ही काळजी घेतली जात आहे.

या योजनेमध्ये ग्राहकांना आता लॉगिन करण्यासाठी त्यांचा युजर आयडी आणि पासवर्ड लागणार आहे. त्यानंतरच या खात्यात कुठलाही बदल करायचा असेल, किंवा पैसे काढायचे आणि भरायचे असतील तर ते शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे आता आधार आधारित लॉगिन पडताळणी करण्यासाठी NPS सदस्यांच्या आयडीसी लिंक केले जाणार आहे.

त्यानंतर त्यांच्या लिंक झालेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. आणि तो ओटीपी टाकल्यानंतरच एनपीएस खात्यात लॉगिन केले जाणार आहे. हे बदल 1 एप्रिल पासून केले जाणार आहेत. त्यामुळे 1 एप्रिल नंतर जर तुम्हाला तुमच्या या खात्यातून पैसे काढायचे असेल तर तुम्हाला दिलेल्या सगळ्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यानंतरच तुम्हाला तुमच्या NPS खात्यातून पैसे काढता येणार आहे.

NPS खात्यातून पैसे कधी काढू शकता

  • तुम्हाला या NPS खात्यातून नेहमी पैसे काढता येणार नाही.
  • काही विशिष्ट परिस्थितीमध्येच तुम्हाला यातून पैसे काढता.
  • तुम्हाला घर खरेदी करायची असेल तर ते करण्यासाठी तुम्ही NPS खात्यातून पैसे काढू शकता.
  • त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या लग्नासाठी देखील या खात्यातून पैसे काढू शकता.
  • वैद्यकीय आणीबाणीच्या वेळेत देखील तुम्ही यातून पैसे काढू शकता.
  • तुम्हाला जर एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा स्टार्टअप करायचे असेल तरी देखील तुम्ही या एमपीएस खात्यातून पैसे काढू शकता.
  • त्याचप्रमाणे कौशल्य विकास खर्चासाठी या खात्यातून पैसे काढता येईल.
  • त्याचप्रमाणे जर अपघात झाला असेल तरी तुम्हाला या नॅशनल पेन्शन सिस्टीममधून पैसे काढता येणार आहे.