नवी दिल्ली । आजच्या काळात आधार कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. बँकिंग सेवांपासून ते विविध सरकारी आणि निमसरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्ड असणे गरजेचे बनले आहे. बायोमेट्रिक्ससोबतच व्यक्तीशी संबंधित इतर महत्त्वाची माहिती आधार कार्डमध्ये नोंदवली जाते.
आता एक मोठा प्रश्न असा आहे की कोणतेही अनिवासी भारतीय म्हणजेच NRI सुद्धा आधार कार्ड बनवू शकतात का? तर याचे उत्तर होय असे आहे. आता अनिवासी भारतीयांना देखील सामान्य भारतीय नागरिकांप्रमाणे आधार कार्ड मिळू शकेल. ऑगस्ट 2021 पर्यंत अनिवासी भारतीयांना आधार कार्ड मिळविण्यासाठी 182 दिवस वाट पाहावी लागायची. मात्र, ऑगस्ट 2021 मध्ये ही अट काढून टाकण्यात आली.
NRI साठी अशाप्रकारे मिळवा आधार कार्ड
विशेष म्हणजे कोणताही प्रौढ आणि अल्पवयीन NRI सुद्धा आधार कार्ड बनवू शकतो. यासाठी अनिवासी भारतीयांना आधार केंद्रात जावे लागेल. अनिवासी भारतीयांकडे आधार कार्ड काढण्यासाठी भारतीय पासपोर्ट असणे आवश्यक आहे. आधार केंद्रावर फॉर्म घेऊन त्यात माहिती भरावी लागेल. येथे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, अनिवासी भारतीयांना ई-मेल आयडी देणे बंधनकारक आहे. अनिवासी भारतीयांसाठीचा आधार कार्डचा फॉर्मही थोडा वेगळा आहे.
हा फॉर्म आयन्टिटी प्रूफ म्हणून पासपोर्टची फोटोकॉपी सोबत असेल. याशिवाय अनिवासी भारतीय इतर व्हॅलिड डॉक्युमेंट्सही देऊ शकतात. हा फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर बायोमेट्रिक कॅप्चर करण्याची प्रोसेस केली जाईल. आधार केंद्रावर ऑपरेटरकडून हे सर्व डिटेल्स सबमिट करण्यापूर्वी ते एकदा तपासले गेले पाहिजेत. ही माहिती कॉम्प्युटर मध्ये टाकल्यानंतर रजिस्ट्रेशन स्लिप दिली जाईल. त्यात 14 अंकी एनरोलमेंट आयडी आणि रजिस्ट्रेशनची तारीख आणि वेळ असेल.
भारतीय मोबाईल नंबर आवश्यक आहे
आधार कार्डसाठी दिलेल्या डिटेल्स मध्ये अनिवासी भारतीयांना भारतीय मोबाइल क्रमांक देणे बंधनकारक आहे. आधार कार्डसाठी आंतरराष्ट्रीय क्रमांकांना परवानगी नाही. त्यामुळे अनिवासी भारतीयाकडे भारतीय मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. एनआरआयच्या मुलाचे आधार कार्ड बनवण्यासाठी वेगवेगळी कागदपत्रे आवश्यक असतात. जर मुलाकडे भारतीय पासपोर्ट असेल तरच त्याचे आधार कार्ड बनवले जाईल. मात्र, जर मुलाकडे भारतीय पासपोर्ट नसेल, तर त्याच्या पालकांना मुलाशी त्यांचे संबंध सिद्ध करणारी कागदपत्रे द्यावी लागतील. याशिवाय, मुलाच्या वतीने आधार कार्ड बनवण्यासाठी पालकांपैकी एकाला मान्यता द्यावी लागेल.