NSP And SPG | आपण अनेकवेळा पाहिलेले आहे की, जेव्हा जेव्हा आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठेही जातात तेव्हा त्यांच्यासोबत नेहमीच काही सुरक्षा युनिट्स असतात. ज्या त्यांना सुरक्षा पुरवत असतात . यातील नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSP)आणि स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप हे (SPG) आपल्या भारताच्या दोन उच्च सुरक्षा युनिट्स आहेत जे युनिट आपल्या देशाच्या पंतप्रधानांसोबत नेहमीच सावलीप्रमाणे उभे असतात.
भारताच्या या कमांडोचे काम | NSP And SPG
हे कमांडो दहशतवादाविरोधी आणि सुरक्षा प्रदान करणे हे काम करत. त्यात VIP आणि VVIP यांसारख्या व्यक्तिमत्त्वांना Z+ सुरक्षा प्रदान करणे. हे त्यांचे मुख्य कार्य आहे. या NSG आणि SPG कमांडो युनिव्हर्सचे सैनिक आणि अधिकारांचे पगार देखील खूप जास्त असतात. अगदी इस्रो मध्येकाम करणाऱ्या वैज्ञानिकांचे जेवढे पगार असतात तेवढेच पगार या सुरक्षा प्रदान करणाऱ्या सुरक्षा युनिट्सला दिले जातात. तर आज आपण SPG आणि NSG कमांडोचा पगार नक्की किती आहे हे पाहणार आहोत.
SPG (SPECIAL PROTECTION GROUP )
या एसपीजी म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये असणाऱ्या सैनिक आणि अधिकाऱ्यांची भरती लष्कराने निमलष्करी दल यांची राज्य पोलिसांकडून प्रतिनियुक्तीवर केली जाते. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या वेतनश्रेणीनुसार पगार मिळतो. आणि त्यानुसार त्यांचे भत्ते आणि त्यांना विविध सरकारकडून सुविधा देखील पुरवल्या जातात.
त्याचप्रमाणे आपण निमलष्करी दलातील किंवा राज्य पोलिसांतून निरीक्षक दर्जाचा कोणी एसपीजीमध्ये सामील झाला तर त्याला तिथे सुरक्षा अधिकारी I हा दर्जा मिळतो. त्याची वेतन श्रेणी ग्रेड पेनुसार 4600 रुपये आणि 4800 रुपये तसेच ते बँड नुसार 9300 आहे.
NCG (NATIONAL SECURITY GUARD)
NCG मध्ये म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्डमध्ये ठराविक कालावधीपर्यंत तुम्ही सेवा दिल्यानंतर त्यांना त्यांच्या पालक केंद्र आणि विभागात परत पाठवले जाते. त्यांना त्यांच्या पालक संवर्ग विभागाचे श्रेणीनुसार पगार दिला जातो. पंतप्रधानांच्या सुरक्षेतेसाठी असलेले एसपीजी कमांडोंना ८४२३६ रुपये ते 2 लाख 39 हजार 457 रुपये एवढा पगार दिला जातो. त्याचप्रमाणे बोनस आणि इतर भत्ते देखील त्यांना उपलब्ध असतात.
म्हणजेच एसपीची कमांडोना दर महिन्याला 84 हजार 236 ते 2 लाख 44 हजार 632 रुपये एवढा पगार मिळतो. तसेच ऑपरेशन ड्युटी करणाऱ्या कमांडोंना दरवर्षी 27 हजार 800 रुपये आणि नॉन ऑपरेशन ड्युटी करणाऱ्यांना 21 हजार 225 रुपये मिळतात.
एनसीसीचे जे प्रमुख महासंचालक असतात त्यांना दर महिन्याला हा 2 ते E लाख रुपये पगार मिळतो. त्याचप्रमाणे अतिरिक्त महासंचालकाचे पगार हा 2 ते 2.5 लाख रुपये असतात त्याचप्रमाणे महानिरीक्षकाचा पगार हा एक लाख 35 हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत असतात.
एनसीजी उपनिरीक्षकांना 1 लाख 25 हजार रुपये ते 1 लाख 35 हजार रुपये एवढा मासिक पगार असतो. त्याचप्रमाणे त्यांना वेगवेगळे भत्ते देखील दिले जातात. ग्रुप कमांडरला 1 लाख ते 1 लाख 25 हजार रुपये एवढा पगार असतो. त्याचप्रमाणे दुसऱ्या कमांडरला 90 हजार ते1 लाख रुपये एवढा पगार असतो. टीम कमांडरला 80 हजार ते 90 हजार रुपये मासिक पगार असतो.