हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीची ऊर्जा कंपनी एनटीपीसी लिमिटेड (NTPC) अंतर्गत येणाऱ्या एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विविध तांत्रिक आणि प्रशासनिक पदांसाठी ही भरती होत आहे, त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
भरतीसंदर्भातील माहिती
या भरती मोहिमेअंतर्गत एकूण १८२ पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. अर्ज प्रक्रिया ११ एप्रिल २०२५ पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १ मे २०२५ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेआधी अर्ज दाखल करावा.
रिक्त पदे
NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये खालील पदांसाठी भरती होणार आहे.
इंजिनियर (आरई – सिव्हिल) – ४० पदे
इंजिनियर (आरई – इलेक्ट्रिकल) – ८० पदे
इंजिनियर (आरई – मेकॅनिकल) – १५ पदे
कार्यकारी (एचआर) – ७ पदे
कार्यकारी (फायनान्स) – २६ पदे
निवड प्रक्रिया आणि पात्रता
- – अर्जदाराचे वय ३० वर्षांच्या आत असावे.
- – उमेदवारांची निवड स्क्रीनिंग टेस्ट, लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.
- – निवड झालेल्या उमेदवारांना NTPC च्या ग्रीन एनर्जी क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल.
दरम्यान, NTPC ही भारतातील एक नामांकित आणि विश्वासार्ह ऊर्जा कंपनी आहे. त्यामुळे ही संधी तरुणांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन भरतीसंबंधी सविस्तर माहिती घ्यावी आणि योग्य वेळेत अर्ज दाखल करावा. तसेच, अधिक माहितीसाठी NTPC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.




