NTS परिक्षेत यशवंत हायस्कुलचे यश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | नॅशनल टेलेंट सर्च परिक्षेत यशवंत हायस्कुल, कराड येथील ऋषीकेश गंबरे या विद्यार्थ्याने यश संपादन केले आहे. देश पातळीवर आयोजित करण्यात येणार्‍या नॅशनल टेलेंट सर्च परिक्षेत गंबरे यांने यश संपादन केल्याने त्याचे कौतुक होत आहे.

एन.टी.एस. परिक्षा उत्तीर्ण होऊन गंबरे हे शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत. गंबरे यांचा 118 स्कोर झाला असून ओबीसी गटातून ते उत्तीर्ण झालेत. या यशात यशवंत हायस्कूल येथील शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याचं गंबरे यांनी सांगितले आहे.

दरम्यान सदर यशाबद्दल अॅड. मा. श्री. रविंद्र पवार (भाऊ) मॅनदजिंग कौन्सिंग सदस्य, रयत शिक्षण संस्था, मुख्याध्यापक मा. श्री. डी. डी. पाटील, उपमुख्याध्यापक मा. श्री. पवार सर, पर्यवेक्षक श्री. नलवडे, आदींनी यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार व अभिनंदन केले. तसेच विभागप्रमुख श्री थोरवडे पी.पी. यांचेही अभिनंदन केले.