Nubia Flip 5G : स्वस्तात लाँच झालाय फोल्डेबल मोबाईल; दिसायला खास आणि फीचर्सही भन्नाट

Nubia Flip 5G launch
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल बाजारात नवनवीन आणि अपडेटेड फीचर्ससह मोबाईल लाँच होत आहेत. गेल्या काही महिन्यात फोल्डबल मोबाईल सुद्धा मार्केटमध्ये आले, मात्र फोल्डेबल मोबाईलच्या किमती लाखोंच्या घरात असल्याने सर्वसामान्य ग्राहक इच्छा असूनही ते खरेदी करू शकले नाहीत. यावर मार्ग काढण्यासाठी प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Nubia ने स्वस्तात मस्त असा फोल्डेबल मोबाईल लाँच केला आहे. Nubia Flip 5G असे या स्मार्टफोनचे नाव असून त्याची सुरुवातीची किंमत अवघी 34,500 रुपये आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेऊयात….

6.9 इंचाचा डिस्प्ले –

Nubia Flip 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.9-इंचाचा फुल HD + OLED इनर डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्लेल 1,188 x 2,790 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. यासह या स्मार्टफोनमध्ये 1.43 इंचाचा OLED कव्हर डिस्प्ले देण्यात आलाय ज्याचे रिझोल्यूशन 466 x 466 पिक्सेल इतकं आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये Octa Core Snapdragon 7 Gen 1 SoC प्रोसेसर दिला आहे. मोबाईलमध्ये 8GB + 256GB आणि 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आला आहे.

50-मेगापिक्सलचा कॅमेरा – Nubia Flip 5G

मोबाईलच्या कॅमेराबद्दल सांगायचं झाल्यास, , Nubia Flip 5G च्या पाठीमागील बाजूला 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा,2-मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा देण्यात आलाय तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी या फोल्डेबल मोबाईल मध्ये 4,310mAh बॅटरी दिली आहे. हि बॅटरी 33W टाइप सी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

मोबाईलच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास, Nubia Flip 5G च्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत चीनमध्ये CNY 2,999 म्हणजेच अंदाजे 34,500 रुपये आहे, तर 12GB + 256GB ची किंमत CNY 3,299 म्हणजेच 38,000 रुपये आहे. हा स्मार्टफोन सध्या चीनमध्ये तसेच जागतिक स्तरावर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. येत्या 23 एप्रिलपासून मोबाईलची विक्री सुरु होईल.