हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंब्याच्या पानांचा उपयोग फक्त धार्मिक कार्यामध्येच नाही, तर ते त्वचा देखभाल आणि सौंदर्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर ठरतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेच्या समस्यांवर मात करण्यास मदत करतात. आंब्याच्या पानांचा नियमित वापर त्वचेला स्वच्छ, ताजेतवाने आणि निरोगी ठेवतो. आयुर्वेदानुसार, आंब्याच्या पानांचे सेवन आणि त्यांचा बाह्य उपयोग शरीराला चांगला फायदा देतो. तर चला या आंब्यांच्या पानांच्या फायद्याबद्दल अधिक सविस्तरपणे जाणून घेऊयात.
त्वचा गुळगुळीत आणि चमकदार –
धूळ आणि उन्हामुळे चेहऱ्याचा ताजेपणा नाहीसा होतो. अशा परिस्थितीत बाजारातून सनस्क्रीन घेतल्या जातात, पण तुम्ही जर आंब्याच्या पानांचे पेस्ट तयार करून ती चेहऱ्यावर फेस मास्क म्हणून लावली तर तुमची त्वचा गुळगुळीत आणि चमकदार होईल.
पिंपल्स घालवण्यासाठी मदत –
पिंपल्स किंवा मुरुमं, जे त्वचेतील तेल आणि मळाच्या नलिकांमध्ये अडथळा निर्माण होऊन होतात. यामुळे त्वचेवर सूज, लालसरपणा आणि कधी कधी वेदना होतात. या समस्येपासून वाचण्यासाठी उपाय म्हणून तुम्ही आंब्याच्या पानांचा वापर करू शकता. अन त्यामुळे तुमच्या त्वचेचे सौम्य रूप देखील मिळते.
सुरकुत्या (wrinkles) कमी होण्यास मदत –
आंब्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन C चांगल्या प्रमाणात असते , जो कोलेजनच्या उत्पादनास उत्तेजित करतो. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील रिंकल्स , सुरकुत्या (wrinkles) कमी होऊ शकतात आणि त्वचा अधिक ताजेतवाने दिसते.
आंब्याच्या पानांचा फेस मास्क –
आंब्याच्या पानांचा फेस मास्क तयार करण्यासाठी आंब्याची पानं घ्या आणि थोडं पाणी घालून ते चांगलं मिक्स करा. त्यात दोन चमचे दही घालून मिश्रण तयार करा. त्यानंतर, 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा आणि थोडं उबदार पाणी वापरून चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा पुन्हा ताजीतवानी आणि चमकदार होईल. आंब्याच्या पानांचा नियमित वापर त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. तुम्ही या पद्धतींचा वापर करून आपल्या त्वचेची नैसर्गिक चमक परत मिळवू शकता.