Nurse Recruitment 2024 | नर्स पदासाठी तब्बल 1930 पदांची भरती सुरु, 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार

Nurse Recruitment 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Nurse Recruitment 2024 | तुम्ही जर नर्सिंगचे शिक्षण घेतलेले असेल. आणि आता तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत चांगली संधी आहे. ज्यातून तुम्हाला खूप चांगली नोकरी लागणार आहे तुम्हाला थेट भारत सरकारमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. येथे तुम्हाला 7 वा CPC म्हणजेच सेंट्रल पे कमिशन पगार मिळणार आहे. एम्प्लॉयी स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन यांनी नर्स (Nurse Recruitment 2024) या पदाच्या रिक्त पदांची घोषणा केलेली आहे. त्यांनी एकूण 1930 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यांनी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. या भरतीची जबाबदारी यूपीएससीकडे देण्यात दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर आता अर्ज करायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करा.

या पदासाठी जर तुमची निवड झाली तर तुम्हाला केंद्र सरकारमध्ये नॉन मिनिस्ट्रियल ग्रुप B ची कायमस्वरूपी नोकरी मिळेल. आणि तुमचा पगार हा सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला मिळणार आहे.

श्रेणी पदांची संख्या

  • सामान्य – 892 जागा
  • आर्थिक दृष्ट्या कमकुवत विभाग – 193 जागा
  • ओसीसी – 446 जागा
  • अनुसूचित जाती – 235 जागा
  • एसटी – 164 जागा
  • अपंग व्यक्ती – 128 जागा.

शैक्षणिक पात्रता | Nurse Recruitment 2024

  • उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून बीएससी नर्सिंग किंवा पोस्ट बेसिक बीएससीचा अभ्यास केलेला पाहिजे.
  • राज्य नर्सिंग कौन्सिलमध्ये नर्सिंग मिडवाइफरी म्हणून नोंदणीकृत असणे गरजेचे आहे.
  • नर्सिंग मिडवायफरीमध्ये डिप्लोमा केलेला पाहिजे आणि राज्य नर्सिंग कौन्सिलमध्ये नर्स किंवा नर्सिंग मिडवायफरीमध्ये नोंदणी पाहिजे.
  • किमान 50 खाटा असलेल्या रुग्णालयाचा एक वर्षाचा अनुभव पाहिजे.

वयोमर्यादा

अर्ज करण्यासाठी किमान 18 वर्षे ही वयोमर्यादा आहे.

  • श्रेणी कमाल वयोमर्यादा
  • सामान्य श्रेणी आणि EWS – 30 वर्ष
  • ओबीसी – 33वर्षे
  • एसी किंवा एसटी – 35 वर्ष
  • दिव्यांग – 40 वर्ष

नर्सिंग ऑफिसरची भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे यासाठी 7 मार्चपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे 27 मार्च 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन फॉर्म भरू शकता. नर्सिंग ऑफिसरची परीक्षा ही यूपीएससी द्वारे 7 जुलै 2024 रोजी घेणार आहे ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होईल.

पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा