आज जागतिक परिचारिका दिवस हा जगभरात साजरा केला जातो.
पण,यंदा कोरोना च्या पार्शवभूमीवर लॉकडाऊन असल्याने सगळेच महत्वाचे दिन हे घरीच बसून साजरा केले जात आहेत.अशाच आजच्या दिवशी ही त्या आहेत सज्ज.
मुलाखत घेत असताना घाटी रुग्णालयाच्या परिचारिका सचिव इंदुमती थोरात यांनी सांगितले,कि परिचारिका साठी हा एक महत्वाचा दिवस असतो पण यादिवशी ही आमच्या परिचारिका रुग्ण सेवेत रुजू आहेत. दिवसाचे बारा बारा तास रुग्णसेवेत आहेत स्वतःची जीवाची पर्वा न करता दिवस रात्र सेवा देत आहेत. कोरोना काळात ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोविड रुग्ण सेवा करत आहेत.
रुग्ण बरा होऊन सुखरूप घरी पोहचवा हाच आमच्यासाठी हा परिचारिका दिवस साजरा केल्यासारखं आहे. हे आमचं कर्तव्य असून आम्ही ते पुढेही करणार असेही ह्या दिवशी त्यांनी सांगितले.




