नाशिक प्रतिनिधी | भीकन शेख
राज्यात अनेक ठिकाणी नर्सरी शाळेचे पेव फुटलेले आहेत. आणि या शाळेत अनेक वेळा लहान मुलांवर अन्यायाच्या घटना वारंवार समोर येतात. अशा प्रकारच्या घटनांना तात्पुरता आळा बसतो नन्तर हे प्रकार पुन्हा सुरु होतात. अशीच एक घटना महाराष्ट्रातील नाशिक शहरात घडली आहे.
पाईपलाईन रस्त्यावर असलेल्या एका खासगी प्ले स्कूलमधील एका शिक्षिकेने साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला असून शहरातून या शिक्षिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. प्रकरण समोर आल्यानंतर मुलाच्या पालकांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गर्दी केली आहे.
श्रेयस महेंद्र पवार असे या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
श्रेयस महेंद्र पवार हा प्ले स्कूलमध्ये जाणारा मुलगा आजारी होता. त्याच्यावर उपचार करण्यासाठी आईवडिल काही दिवसांपूर्वी त्यास नाशिकमध्ये घेऊन आले होते. आजारी असलेल्या मुलाला शिक्षिकेने केलेल्या मारहाणीमुळे संताप व्यक्त केला जात असून शिक्षिकेवर कडक कारवाई करून प्ले स्कूल कायमचे बंद करावे अशी मागणी परिसरातून होत आहे.