NZ vs IND,पहिली कसोटी: वेगवान खेळपट्टीवर विराट कोहली ब्रिगेडची असेल ‘रिअल टेस्ट’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Zealand vs India, 1st Test:शुक्रवारीपासून बेसिन रिझर्व्हच्या वेगवान खेळपट्टीवरील पहिल्या कसोटी सामन्यात देशात आणि परदेशात विजयाचा ठसा उमटविणारा विराट कोहलीचा भारतीय क्रिकेट संघाला सामना न्यूझीलंडशी होईल, हा भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आतापर्यंतचा सर्वात कठीण सामना असेल. अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाचे ३६० गुण झाले असून कागदावर भारताचा संघ वरचढ दिसत आहे, पण केन विल्यमसनचा किवी संघ त्यांच्याच घरच्या मैदानावर धोकादायक ठरू शकतो. मार्च २०१७ मध्ये न्यूझीलंडने घरच्या मैदानावर अखेरची कसोटी मालिका गमावली होती. तेव्हापासून त्यांनी येथे दहापैकी पाच कसोटी सामने जिंकले आहेत.ऑस्ट्रेलियाकडून ३-० ने पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंडचा संघ आपल्या विजयाच्या मार्गावर येण्यासाठी प्रयत्नशील असेल, तर भारतीय संघाला हे सिद्ध करायला आवडेल की गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये मिळालेला विजय हा अचानक मिळालेला नव्हता. पण प्रतिकूल परिस्थितीत विजय कसा मिळवायचा हे भारताला माहित आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ४;०० वाजता सुरू होईल.

विरुद्ध दिशेने येत हवेचा झोत येत असल्यामुळे येथील बेसिन रेसेर्व्ह चे मैदान गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. अशा परिस्थितीत पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल या नव्या सलामी जोडीला कसोटी सामन्यात पुनरागमन करणार असलेल्या ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी आणि काईल जेमिसन या जगातील अव्वल गोलंदाजांना सामोरे जावे लागेल. डावखुरा वेगवान गोलंदाज नील वेगनरच्या अनुपस्थितीमुळे भारतीय मधल्या फळीने सुटकेचा श्वास घेतला असेल. आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मामुळे वेगनर ब्रेकवर आहे. न्यूझीलंड संघातील अष्टपैलू खेळाडूंमध्ये डॅरेल मिशेल आणि डावखुरा फिरकीपटू एजाज पटेल हे असतील.

नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार कोहली कदाचित गोलंदाजीची निवड करू शकेल, यासाठी जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी खेळपट्टीच्या प्र मदतीचा फायदा घेऊ शकतील. स्वत: कोहलीने हे मान्य केले आहे की त्याच्या संघाला खेळपट्टीशी जुळवून घेण्यासाठी काही वेळ थांबावे लागेल, तर विल्यमसनची टीम ही संयमासाठी ओळखली जाते. कोहली म्हणाला, ‘विरोधी संघ कितीही संयमित असला तरी आपल्याला अधिक संयम दाखवावा लागेल.” न्यूझीलंडचा संघ चार वेगवान गोलंदाज आणि एका अष्टपैलू खेळाडूसह मैदानात उतरू शकतो, तर भारतीय संघ व्यवस्थापन रवींद्र जडेजा किंवा फिरकी गोलंदाज असलेल्या आर.अश्विनला मैदानात उतरावू शकेल.दुखापतीनंतर परतलेल्या ट्रेंट बाउल्ट मुळे न्यूझीलंडचा संघ तर इशांतच्या पुनरागमनानंतर
भारतीय संघ मजबूत झाला आहे.तर फलंदाजी मध्ये चेतेश्वर पुजारा, कोहली आणि अजिंक्य रहाणेवर भारतीय संघाची मदार असेल.

या खेळाडूंमधून दोन्ही संघांची निवड केली जाईल:
भारतः विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिद्धिमान साहा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा.
न्यूझीलंडः केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लूंडेल, ट्रेंट बाउल्ट, कॉलिन डी ग्रँडहॉमे, काईल जेमीसन, टॉम लाथम, डॅरेल मिशेल, हेन्री निकोलस, ऐजाज पटेल, टिम साउथी, रॉस टेलर, बीजे वॅटलिंग.

 

Leave a Comment