तर जपानमधे पुन्हा त्सुनामी! समुद्रकिनार्‍यावर हा दुर्मिळ मासा सापडल्यामुळे खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टोकीयो वृत्तसंस्था | जपानमधील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातारण आहे. कारण खोल समुद्रात राहणारी ऑरफिश रहस्यरित्या किनारपट्टीवर सापडल्याने शहरात सुनामी सारखे नैसर्गिक संकट येऊ शकते अशा चर्चा स्थानिक नारिकामधे सुरु आहे. त्यामुळे जपानमध्ये नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जपानच्या टोयामा खाड़ीजवळ मागील तीन दिवसांमध्ये तीन ऑरफिश मच्छिमारांना मिळाल्या आहे. या ऑरफिश समुद्रातील पाण्यात 3,000 फीट अंतरावर असतात. जापान मध्ये या ऑरफिश लोक खूप घाबरतात. तेथील नागरिकांमध्ये ही मान्यता आहे की ही ऑरफिश ‘समुद्री देवताची संदेशवाहक आहे. भूकंप आणि सुनामी सारख्या घटनांचे संकेत देण्यासाठी हा मासा समुद्राच्या किनाऱ्यावर येतो, अशी धारणा येथील स्थानिकांची आहे.

लाइव साइंसच्या अहवालानुसार सन २०११ मध्ये तोहोकू भूकंपागोदर उत्तर पूर्व तटावर ऑरफिश या २० माशा सापडल्या होत्या. त्यानंतर येथील रहिवाश्यांना भयंकर भूकंपाचा सामना करावा लागला होता. ज्यात 19,000 नागरिक मृत्युमुखी पडले . तसेच फुकुशिमा परमाणु ऊर्जा संयंत्र नष्ट झाले होते . यगोदरही सन २०१० मध्ये चिली येथे ८.८ अशी तीव्रता असलेला भूकंप येण्याअगोदरही १२ ऑरफिश येथील समुद्र तटावर आढळल्या होत्या. अशा प्रकारच्या अनेक घटनांचा अनुभव नागरिकांना आला आहे .

विशेषज्ञांच्या माहितीनुसार ऑरफिश समुद्र तटावर दिसली की भूकंप होईल यावर विश्वास ठेवता येणार नाही. मात्र संशोधन करणाऱ्यांच्यानुसार ऑरफिशया माश्यांना नैसर्गिक आपत्तीचे संकेत मिळत असावेत असे म्हणणे आहे. त्यामुळे जपानमध्ये भूकंप आणि सुनामीसारख्या घटना घडू शकतात हे टाळता येणार नाही, अशी भीती नागरिकांमध्ये आहे.

इतर महत्वाचे –

पुण्यात एलिअन दिसला, पंतप्रधान कार्यालयाला पत्र!

दादा, मी प्रेग्नंट आहे, होर्डीग चर्चा

इंदुरीकर महाराजां बद्दल च्या या गोष्टी तुम्हाला माहीती आहेत काय?

याच फोटोमुळे त्याने आपण त्या मुलीला काहीच मदत करू शकलो नाही या अपराधी भावनेतून आत्महत्याही केली..

एकतर्फी प्रेमातून त्याने चक्क माॅडेलला ठेवले ओलीस, पोलीसांवर केला गोळीबार

Leave a Comment