Oats Side Effects | तुम्हीही रोज नाश्त्यामध्ये ओट्स खाता का? जाणून घ्या हे 5 तोटे

Oats Side Effects
Oats Side Effects
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Oats Side Effects | आजकाल लोक त्यांच्या नाष्ट्यामध्ये विविध पदार्थ खायला लागलेले आहेत. परंतु अनेक लोक हे पौष्टिक खाण्याला महत्त्व देतात. अशातच लोक सकाळी नाष्ट्यामध्ये ओट्स खातात. ओट्समध्ये जास्त प्रमाणात प्रथिने, फायबर आणि कॅल्शियम असतात. आणि आपल्या आरोग्यासाठी ते चांगले देखील असते. परंतु ओट्सच्या अतिरिक्त सेवनाने तुमच्या आरोग्य संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. आज आपण आहारात ओट्सचा समावेश केल्यानंतर तुमच्या आरोग्याला काय नुकसान ( Oats Side Effects) होणार आहे. ते जाणून घेणार आहोत.

रक्तातील साखरेची पातळी वाढते

तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचे मुख्य कारण हे दररोज ओट्स खाणे हे देखील असू शकते. ओट्समध्ये जास्त प्रमाणात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रस असतात. ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना देखील त्रास होतो.

एलर्जीचा धोका |  Oats Side Effects

तुम्ही जर नियमितपणे ओट्सचे सेवन करू शकत असेल, तर तुमच्या त्वचेशी संबंधित अनेक समस्या देखील उद्भवतात. तुम्हाला ॲलर्जीच्या स्वरूपात रिएक्शन दिसू शकतात. त्याचप्रमाणे त्वचेवर पुरळ येणे, जळजळ होणे यासारख्या समस्या उद्भवतात.

मूत्रपिंडा संबंधी समस्या

ओट्सच्या सेवनाचा परिणाम तुमच्या किडनीवर देखील होत असतो. त्यामुळे ज्या लोकांना किडनी समस्या आहेत. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने दररोज ओट्स सेवन करावे. अन्यथा तुम्हाला अनेक आजारांना सामोरे जाऊ लागू शकते.

खराब पचन

तुम्हाला जर पचन संस्थेची संबंधित आणि समस्या असतील, तर ओट्स खाणे तुमच्यासाठी धोकादायक आहे. ओट्समध्ये जव, गहू आणि राई यांसारख्या नैसर्गिकरित्या ग्लुटेन मुक्त धान्यांवर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्याचप्रमाणे यामध्ये असलेल्या उच्च फायबरमुळे गॅस होत्या आणि ऍसिडिटी देखील होत असते.

प्रक्रिया केलेल्या ओट्स |  Oats Side Effects

आजकाल बाजारामध्ये प्रक्रिया केलेले ओट्स जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे अतिरिक्त चव येते. आणि जास्त काय टिकून देखील राहतात. परंतु रसायन आणि असलेली हे ओट्स तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असते. तुम्ही जर रोजचे वापर केला तर तुमच्या आरोग्यविषयक अनेक समस्या उद्भवतात.