187 KM रेंजसह बाजारात आली नवी Electric Bike; कंपनी देतेय 40 हजारांचा डिस्काउंट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक गाडयांची चांगलीच चलती असून पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी बघता जवळपास सर्वच वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लाँच करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी Oben Electric ने ओबेन रोर बाईक लाँच केली आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक बाईक तब्बल 187 KM पर्यंत रेंज देते हि या गाडीची खासियत आहे. आज आपण या इलेक्ट्रिक बाईकचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

187 KM रेंज –

Oben Rorr बाईक मध्ये ८ किलोवॅट क्षमतेची पॉवरफुल अशी मोटर बसवण्यात आली आहे. बाईकला IP67 रेटिंगसह 4.4 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनी बॅटरीवर तीन वर्षे किंवा 50 हजार किलोमीटरची वॉरंटीही देते. एकदा हि बॅटरी फुल्ल चार्ज केल्यानंतर हि इलेक्ट्रिक बाईक तब्बल 187 किलोमीटरपर्यंत अंतर सहज पार करते. यावेळी गाडीचे टॉप स्पीड 100 किलोमीटर प्रति तास इतक असते. अवघ्या तीन सेकंदात हि इलेक्ट्रिक बाइक 0-40 किमी वेग वाढवण्यास सक्षम आहे. ड्रायव्हिंगसाठी या इलेक्ट्रिक बाईक मध्ये इको, सिटी आणि हॅवॉक मोड देण्यात आले आहेत.

अन्य फीचर्स –

अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, या इलेक्ट्रिक बाईकमध्ये एलईडी हेडलॅम्प, सिंगल पीस सीट, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ड्रायव्हर अलर्ट सिस्टीम, जिओ फेन्सिंग थेफ्ट प्रोटेक्शन, 200 एमएम ग्राउंड क्लीयरन्स, 230 एमएम वॉटर वेडिंग यासारखे फीचर्स आहेत. या इलेक्ट्रिक बाइकची वॉटर वेडिंग क्षमता अंदाजे 230 मिमी आहे. म्हणजेच पाण्याने भरलेल्या रस्त्यावरही तुम्ही हि बाईक आरामात चालवू शकता.

किंमत किती?

कंपनीने ही बाईक 1.50 लाख रुपयात लाँच केली आहे. मात्र कंपनी पहिल्या 100 ग्राहकांना 40 हजार रुपयांची सूट देत आहे. म्हणजेच अवघ्या 1.10 लाख रुपये किमतीत ग्राहक खरेदी करू शकतात.