अधिकाऱ्यांनी सुटीच्या दिवशीही तालुक्यांना भेटी द्याव्यात

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदावले यांच्या सूचना

औरंगाबाद । ग्रामीण भागामध्ये कोरोनाची झपाट्याने वाढ होत आहेत. आता अधिकाऱ्यांनी सुटीच्या दिवशीही नेमलेल्या तालुक्यांत भेटी द्याव्यात आणि रुग्ण तपासणी, लसीकरण याचा आढावा घ्यावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय कोरोना संक्रमित गावात रुग्ण शोध लसीकरण, तपासणी याचा आढावा आणि लसीकरणाचे उद्दिष्ट घेण्यासाठी नेमलेल्या 9 संपर्क अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या खाते प्रमुखांनी असलेल्या सेंटर आणि प्रभावित गावांना भेटी देऊन कंटेनमेंट ड्रेसिंग तपासणीसह लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्ष देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. कोरोना प्रतिबंधक उपाय योजनासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांच्यासह गंगापूर- सुरज प्रसाद, जैस्वाल पैठण- बी बी चव्हाण, वैजापूर- आनंद गंजेवार, खुलताबाद – डॉ. सुनील भोकरे, सोयगाव- डाॅ. रत्नाकर पेडगावकर, फुलंब्री’ प्रसाद मिरकले, कन्नड- पाटील औरंगाबाद- एस. एम. बुल या अधिकाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सुटीच्या काळात नेमलेल्या तालुक्यात भेटी देऊन महसूल विभागाचे मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल पोलीस पाटील ग्रामसेवक पंचायत समिती गणाची संपर्क अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

केंद्र रुग्णालयातील व्यवस्था यंत्रसामुग्रीची खात्री करून घ्यावी जेवण, वीज, पाणी व्यवस्था नियमित असल्याची खात्री करावी. आवश्यक औषधी सुरक्षा साधनांची उपलब्धतेवर लक्ष द्यावे. शनिवार, रविवार व सोमवारी आलेल्या तिन्ही सुट्टीच्या दिवसात हा आढावा घेणे, अत्यंत आवश्यक असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

You might also like