‘गो ग्रीन’चा संदेश देणाऱ्या ‘झाड’ चित्रपटाचा टिझर लॉंच; पहा व्हिडीओ

Marathi Movie
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। झाड वाचवण्यासाठी, झाड लावण्यासाठी आणि झाड जगवण्यासाठी केलेला संघर्ष, पर्यावरण संवर्धनाचा कानमंत्र देणाऱ्या झाड या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आधारित हा चित्रपट २१ जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्र आणि गोवा राज्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. अर्थात हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आता काही दिवसच प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

योगेश लिलाधर राजपूत यांनी प्रस्तुती केलेल्या “झाड” या चित्रपटाची निर्मिती द ग्रीन इंडिया फिल्म्स यांनी केली आहे. सचिन बन्सीधर डोईफोडे या चित्रपटाचे निर्माता आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सचिन बन्सीधर डोईफोडे यांनीच केलं आहे.प्रशांत मुरकुटे सह-दिग्दर्शक व गणेश मोरे प्रमुख सहयोगी दिग्दर्शक आहेत. सतीश सांडभोर यांनी छायांकन, रंगभूषा, वेशभूषा केली आहे. शरद ठोंबरे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. पी. शंकरम यांनी पार्श्वसंगीत केलं आहे. प्रल्हाद उजगरे यांनी क्रिएटिव्ह दिग्दर्शनाचं काम केलं आहे.आदर्श शिंदे आणि जान्हवी अरोरा यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत.

तगडी स्टारकास्ट

चित्रपटात डॉ. दिलीप डोईफोडे, प्रकाश धोत्रे, संदीप वायबसे, शिवलिंगआप्पा बेंबळकर, कैलास मुंडे, प्रल्हाद उजागरे, प्रशांत मुरकुटे, संजीवकुमार मेसवाल, जोशना नेहरकर, दुर्वास मोरे, जयदेव वायबसे, दत्तात्रय मुंडे, देवई डोईफोडे, मच्छिंद्र डोईफोडे, प्रियंका नेहरकर, ओमकार डोईफोडे, करण डोईफोडे, माऊली सानप, काजल डोईफोडे, पंकजा वायबसे, जान्हवी कदम, राजवी डोईफोडे, आयन हजारे अशी स्टारकास्ट आहे.

टिझर लॉंच

निसर्गचक्रामध्ये झाडांचं स्थान अनन्यसाधारण आहे. कारण फळे, फुलांवर अनेक प्रकारचे पक्षी अवलंबून असतात. मात्र माणसाने आपल्या हव्यासापायी प्रचंड प्रमाणात झाडे तोडली. त्यातून जंगलांचा नाश होऊ लागला आणि वन्यजीव, माणूस असा नवा संघर्ष उभा राहिला. जागतिक तापमानवाढीचा मुद्दा तापत असताना, उन्हाची तीव्रता वाढतच जात आहे . त्यामुळे झाडे लावणे, त्यांची जोपासना करणे, जंगले निर्माण करणे हाच उपाय आहे. म्हणूनच झाडांचं जतन, संगोपन आणि पर्यावरण संवर्धन हा विषय चित्रपटातून मांडण्याचा अनोखा प्रयत्न झाड चित्रपटातून केला आहे. चित्रपटाच्या टीजर मधून चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. नव्या दमाचे कलाकार, संपूर्णपणे वेगळा विषय हा चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे.