Sunday, March 26, 2023

ओगलेवाडीत युवकावर खुनी हल्ला; उपचारादरम्यान जखमी युवकाचा मृत्यू

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

ओगलेवाडी ता. कराड येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून धारदार शस्त्राने युवकावर खुनी हल्ला झाला. यामध्ये सदर युवकाचे मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर जखमी युवकाला उपचारासाठी शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरु असतानाच युवकाचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. घटनास्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नरेंद्र अनिल कदम (वय 22 रा. हजारमाची ता. कराड) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, ओगलेवाडी ता. कराड येथे शनिवारी सकाळी दोन युवकांचा मध्ये किरकोळ कारणावरून वादावादी झाली. ही वादावादी सामोपचाराने मिटविण्यात आली. मात्र यानंतर सायं. 5 च्या सुमारास नरेंद्र कदम याच्यावर खुनी हल्ला झाला. यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला आहे.

युवकावर हल्ला झाल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. उपस्थित नागरिकांनी सदर युवकाला तातडीने उपचारासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.