Saturday, March 25, 2023

अरे बापरे! दररोज पाणीपुरी खाण्यासाठी येणारी तरुणी पडली पाणीपुरीवाल्याच्याच प्रेमात! पुढे झालं असं काही

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाणीपुरी म्हंटल कि मुलीच्या सगळ्यात आवडता पदार्थ. असं एक पण ठिकाण नसेल कि पाणीपुरी वाला आपला गाडा विकण्यासाठी लावतो पण त्या गाड्यावर एकही मुलगी पाणी पुरी खाण्यासाठी नसेल . सर्वात जास्त पाणीपुरी खाण्याचे प्रमाण हे मुलींमध्ये जास्त असते. पण पाणी पुरी खाण्यासाठी दररोज येत असलेली मुलगी पाणीवाल्याच्या प्रेमात पडेल आणि ते पळून जातील असं कोणाला स्वप्नात हि वाटलं नसेल. परंतु अशी घटना उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर येथे घडली आहे.

नवभारत टाइम्स या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश मधील हि घटना असून हा प्रसंग लॉकडाउन च्या काळात घडला गेला होता. लॉकडाउन पूर्वी हि मुलगी दररोज पाणीपुरी खाण्यासाठी पाणीपुरी वाल्याच्या दुकानावर जात असायची. पाणीपुरीवाला खूप छान पद्धतीने पाणीपुरी बनवायचा त्यामुळे ती जास्त आवडीने खात असायची . पाणी पुरी खाता खाता त्याचे एकमेकांवर प्रेम जडले आणि त्यांनी तेथून पळून जाण्याचा प्लॅन केला . परंतु त्यांचा हा प्लॅन यशस्वी झाला नाही. ते दोघे त्याच्या घरी पोहचण्यापूर्वी तेथे त्याच्या अगोदर पोलीस हजर होते. त्यांनी त्या मुलीला ताब्यात घेऊन तिच्या परिवाराकडे सोपवण्यात आले. त्यानंतर मात्र तरुणीच्या परिवाराकडून कोणतीही तक्रार दाखल झाली नाही. इज्जत जाईल म्हणून त्यांनी फक्त आपल्या मुलीला सोबत घेऊन गेले त्या मुलाला आणि त्याच्या घरातल्याविरुद्ध तक्रार दाखल झाली नाही.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाउन च्या काळापूर्वी २० ते २२ वर्षांमधील एक मुलगा झासी मधील कछवा बाजारामध्ये त्याचे पाणी पुरी विकण्याचे काम करत होता. त्याचे याच भागात राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमाचे सूत जुळले आणि त्यांनी पळण्याचा विचार केला. पण त्यांचा प्लॅन कामयाब झाला नाही. याबाबत कोणतीही तक्रार मिळाली नाही त्यामुळे कोणताही खटला दाखल झाला नाही. असे पोलिसांनी सांगितल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.