Ohio Plane Crash : अहमदाबादसारखा आणखी एक विमान अपघात!! सर्व प्रवाशांचा मृत्यू

Ohio Plane Crash
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ohio Plane Crash । मागच्या महिन्यात घडलेल्या अहमदाबाद विमान अपघातासारखी आणखी एक विमान अपघाताची घटना समोर आली आहे. धावपट्टी वरून विमानाने टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच हे विमान पुन्हा खाली कोसळलं. अमेरिकेतील ओहायो विमानतळावर हि घटना घडली आहे. या विमान अपघातात एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. हे कुटुंब सुट्टीसाठी फिरायला जात होते, मात्र टेक ऑफ नंतर काही मिनिटातच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, रविवारी सकाळी यंगस्टाउन-वॉरेन प्रादेशिक विमानतळाजवळ ट्विन-इंजिन सेस्ना ४४१ टर्बोप्रॉप कोसळले. यामध्ये कोणीही वाचलं नाही अशी माहिती वेस्टर्न रिझर्व्ह पोर्ट अथॉरिटीचे कार्यकारी संचालक अँथनी ट्रेवेना यांनी पत्रकार परिषदेत दिली. मृतांची ओळखही पटली आहे. यामध्ये , पायलट, जोसेफ मॅक्सिन (वय वर्ष ६३) सह-पायलट टिमोथी ब्लेक, (वय वर्ष ५५) आणि प्रवासी वेरोनिका वेलर (वय वर्ष ६८) तिचा पती, जेम्स वेलर, (वय वर्ष ६७) मुलगा जॉन वेलर, (वय वर्ष ३६) आणि त्याची पत्नी, मारिया वेलर, (वय वर्ष ३४. ब्लेक) यांचा समावेश आहे. (Ohio Plane Crash)

विमान दाट जंगलात कोसळले- Ohio Plane Crash

हॉवलँड टाउनशिप अग्निशमन प्रमुख रेमंड पेस म्हणाले की, विमान दाट जंगलात कोसळले, (Ohio Plane Crash) ज्यामुळे त्या ठिकाणी पोहोचणे कठीण झाले. ही एक अत्यंत दुःखद परिस्थिती आहे. जिथे विमान कोसळलं त्याठिकाणी आणखी ३ घरेही होती. विमान कंपनी जेईटीएस एफबीओ नेटवर्कचे अध्यक्ष मायकेल हिलमन यांनी सांगितलं कि सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या फ्लाइट ट्रॅकिंग डेटावरून असे दिसून आले की हे विमान मोंटाना येथील बोझेमन येथे जाणार होते.

दरम्यान, हा अपघात कसा झाला? यामागील कारणे काय आहेत? याचा तपास एफएए आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड करत आहेत, मात्र त्यांनी अपघाताचे कारण काय असू शकते याबद्दल कोणतेही विधान केले नाही. तसेच त्यांनी नागरिकांना त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघात रेकॉर्ड झाला असेल किंवा तपासात मदत करू शकेल अशी इतर काही माहिती असेल तर त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.