Oil And Ghee | चांगल्या आरोग्यासाठी आहारात करा ‘या’ तेलाचा वापर, बॅड कोलेस्ट्रॉल होईल कायमचे गायब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Oil And Ghee | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. त्याचमुळे त्यांना अनेक आजार देखील होतात. तुम्हाला आयुष्य जर निरोगी जगायचे असेल, तर त्यासाठी तुम्ही तुमचा आहार देखील चांगले घेणे खूप गरजेचे असते. यासाठी घरी बनवलेले पौष्टिक अन्न खाणे गरजेचे असते. अनेक लोक बाहेरचे पदार्थ खातात त्यामुळे तुमचे वजन वाढते. आणि अनेक समस्या देखील वाढतात. यामुळे अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.

जर तुम्हाला निरोगी जीवन जगायचे असेल, तर त्यासाठी सकस, ताजे आणि सहज पचेल असे अन्न खाणे खूप गरजेचे आहे. स्वयंपाक करताना त्यात वापरण्यात आलेले मसाले, तेल, तूप (Oil And Ghee ) हे देखील आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणते तेल आणि तूप आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे असते. तुम्ही जर तेल आणि खूप जास्त प्रमाणात झाले, तर तुमचे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. आणि हृदयाचे आरोग्य देखील बिघडू शकते. त्यामुळे स्वयंपाक करताना कोणत्या प्रकारचे तेल वापरावे ते किती वापरावे हे जाणून घेणे खूप गरजेचे असते. आज आपण अशा तेल आणि तूपाबद्दल माहिती सांगून घेणार आहोत. जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

गाईपासून बनवलेले तूप | Oil And Ghee

तज्ञांच्या मते गाईच्या दुधापासून बनवलेले तूप हे खूप फायदेशीर असते. यामध्ये ब्युटीरिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुमचे पचन देखील चांगले होते आणि आतड्या संबंधित आजार देखील बरे होतात. त्याचप्रमाणे हे तूप सूज कमी करण्यास मदत करतात. हे तूप तुम्ही तळण्यासाठी किंवा कोणत्याही पदार्थ करण्यासाठी वापरू शकता.

मोहरीचे तेल

निरोगी राहण्यासाठी तुम्ही जर जेवणामध्ये मोहरीच्या तेलाचा वापर केला, तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. या तेलामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेड हे फॅट्स असतात. त्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. आणि शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. त्याचप्रमाणे या तेलामुळे हृदयविकाराचा झटका देखील कमी होतात. तसेच या तेलामध्ये बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध असणारे पदार्थ देखील असतात.

एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल

मोहरीच्या तेलासोबत जर तुम्ही एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलचा वापर केला, तर त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. यामध्ये पॉलिफिनॉल आणि विटामिन ई यांसारखे घटक असतात. त्याचप्रमाणे हे तेल अँटिऑक्सिडंटचा एक चांगला स्त्रोत आहे. यामुळे जुनाट आजारांपासूनचा धोका कमी होतो. त्यामुळे तुम्ही जर आहारात मोहरीचे तेल ऑलिव्ह ऑइल आणि गाईचे दुधापासून बनवलेल्या तुपाचा वापर केला तर तुम्हाला चांगले फायदे होतील.