Oil India Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. आम्ही आमच्या लेखांमार्फत तुम्हाला अनेक सरकारी तसेच खाजगी नोकरीच्या संधी देत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता ऑइल इंडिया लिमिटेड (Oil India Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत इलेक्ट्रिकल टेक्निशियन मेकॅनिकल टेक्निशियन या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 17 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही मुलाखत 9 आणि 11 डिसेंबर रोजी होणार आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव |Oil India Bharti 2024
या भरती अंतर्गत इलेक्ट्रिकल टेक्निशियन आणि मेकॅनिकल टेक्निशियन या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
रिक्त पदसंख्या
या भरती अंतर्गत 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
वयोमर्यादा
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 20 ते 40 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
निवड प्रक्रिया
ही भरती मुलाखती अंतर्गत होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
लुईतपार क्लब, पाइपलाइन मुख्यालय, ऑइल इंडिया लिमिटेड, उदयन विहार, नारेंगी, गुवाहाटी, आसाम-781171
मुलाखतीची तारीख
9 आणि 11 डिसेंबर 2024 रोजी हे मुलाखत होणार आहे.
रिक्त पदसंख्या | Oil India Bharti 2024
इलेक्ट्रिकल टेक्निशियन – 9 जागा
मेकॅनिकल टेक्निशन – 8 जागा
वेतनश्रेणी
या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला 21,450 रुपये एवढा पगार मिळणार आहे.
अर्ज कसा करावा?
- ही भरती मुलाखती अंतर्गत होणार आहे.
- तुम्ही दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
- 9 आणि 11 डिसेंबर रोजी ही मुलाखत होणार आहे
- मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणतेही शुल्क दिले जाणार नाही.