टीम हॅलो महाराष्ट्र। गेल्या काही महिन्यात महागाईने उचांक गाठला असताना नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. मागील तीन ते चार दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा किमतीत घसरण झाल्याने गुरुवारी देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल दरात कपात केली. देशभरात पेट्रोल१५ पैसे तर डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले. मुंबईत पेट्रोल प्रति लीटर ८१.१४ रुपये झाले असून डिझेल ७२.२७ रुपये आहे.
रविवारपासून इंधन दरात घसरण सुरु आहे. चालू आठवड्यात पेट्रोल प्रति लीटर ३५ पैसे आणि डिझेल १९ पैशांनी स्वस्त झाले आहे. जागतिक बाजारात खनिज तेल प्रति बॅरल ६४ डॉलरच्या दरम्यान आहे. मुंबईत पेट्रोल प्रति लीटर ८१ रुपये १४ पैसे आहे तर डिझेलचा दर प्रति लिटर ७२.२७ रुपये आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलसाठी ग्राहकांना ७५ रुपये ५५ पैसे मोजावे लागत असून डिझेल ६८ रुपये ९२ पैसे आहे. बंगळूरमध्ये पेट्रोलचा दर ७८ रुपये ८ पैसे असून डिझेल ७१.२ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ७८.४९ रुपये आणि डिझेल ७२. ८३ रुपये आहे.