Okaya Faast F3 : लाँच झाली वॉटरप्रूफ Electric Scooter; 125 किमी रेंज

Okaya Faast F3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (Okaya Faast F3) वाढत्या किमतींमुळे अनेक लोकांचा कल आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. इलेक्ट्रिक गाड्यांच्या वाढत्या मागणींमुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी गेल्या वर्षभरापासून अनेक इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर Okaya EV ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Okaya Faast F3 लाँच केली आहे. या गाडीची खास गोष्ट म्हणजे ही वॉटरप्रूफ आणि धूळ-प्रतिरोधक स्कूटर आहे.चला जाणून घेऊया या इलेक्ट्रिक स्कुटरची अन्य फीचर्स आणि तिच्या किमतीबाबत…

125 किमीपर्यंत रेंज-

Okaya Faast F3 ला इको, सिटी आणि स्पोर्ट्स असे तीन ड्रायव्हिंग मोड आहेत. या स्कूटरमध्ये 2500W ची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे, जी 3.53 kWh च्या ड्युअल Li-ion LFP बॅटरी पॅकसोबत जोडली गेली आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर, ओकायाची Fast F3 स्कुटर तब्बल 125 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते. हि बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी ४ ते ५ तासांचा वेळ लागतो. स्कूटरच्या बॅटरी आणि मोटरवर कंपनीकडून 3 वर्षे / 30 हजार किमीची वॉरंटी सुद्धा मिळते. गाडीचे टॉप स्पीड 70 किमी प्रतितास आहे.

Okaya Faast F3

फीचर्स – (Okaya Faast F3)

Faast F3 इलेक्ट्रिक स्कूटरच्या फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास, यात रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, रिव्हर्स मोड आणि पार्किंग मोड यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. सस्पेंशनसाठी समोरील बाजूला टेलीस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस हायड्रॉलिक स्प्रिंग शॉक अब्सॉर्बर मिळतात. सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा ही स्कुटर बेस्ट आहे. कारण ही गाडी चोरण्याचा प्रयत्न केल्यास किंवा लॉक केलेल्या स्कूटरला कोणी ढकलण्याचा प्रयत्न केल्यास याची चाके आपोआप लॉक होतील.

Okaya Faast F3

किंमत किती –

Faast F3 स्कुटर इलेक्ट्रिक स्कुटरची एक्स शोरूम किंमत 99,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही स्कूटर मेटॅलिक ब्लॅक, मेटॅलिक सायन, मॅट ग्रीन, मेटॅलिक ग्रे, मेटॅलिक सिल्व्हर आणि मेटॅलिक व्हाइट अशा 6 रंगांमध्ये उपलब्ध आहे.