हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकने अखेर आपली पहिलीवहिली इलेक्ट्रिक बाईक बाजारात लाँच (Ola Electric Bike Launched) केली आहे. ओला रोडस्टर असं या बाईकचे नाव आहे. दिसायला अतिशय स्पोर्टी लूक देणारी ओला ची इलेक्ट्रिक बाईक अवघ्या 74,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली आहे. रोडस्टर एक्स, रोडस्टर आणि रोडस्टर प्रो अशा एकूण तीन व्हेरियंटमध्ये ही बाईक बाजारात आली आहे. आजपर्यंत तुम्ही ओलाची इलेक्ट्रिक स्कुटर बघितली असेल, पण आता तुम्ही ओलाच्या इलेक्ट्रिक बाईकचा आनंद घेऊ शकतो. आज आपण आय बाईकचे संपूर्ण स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात….
Ola Roadster X
ओला रोडस्टरमध्ये 2.5 kWh, 3.5 kWh आणि 4.5 kWh अशा ३ बॅटरी पॅकचा पर्याय आहे. ओलाचा दावा आहे की ही बाईक 124 kmph चा टॉप स्पीड देईल. या बाईकचा 4.5 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकच्या माध्यमातून ग्राहक 200 किलोमीटर पर्यंत अंतर सहज पार करू शकतात. या इलेक्ट्रिक बाईकची किंमत कंपनीने 74,999 रुपये ठेवली आहे. ओलाची हि सरावात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक आहे.
Ola Roadster – Ola Electric Bike Launched
ओला रोडस्टरमध्ये 3.5 kWh, 4.5 kWh आणि 6 kWh बॅटरी पॅकचा पर्याय आहे. एकदा फुल्ल चार्ज केल्ल्यानंतर हि बाईक तब्बल २४८ किलोमीटर अंतर प्रवास करू शकते असा कंपनीचा दावा आहे. गाडीचे टॉप स्पीड १९४ किलोमीटर प्रतितास आहे. एवढच नव्हे तर अवघ्या 2 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडण्यास हि बाईक सक्षम आहे. या इलेक्ट्रिक बाईकची किंमत 1,04,999 रुपये आहे.
Ola Roadster Pro-
ओला रोडस्टर प्रो हे ओलाच्या इलेक्ट्रिक बाइकचे टॉपचे व्हेरिएंट आहे. या बाइकमध्ये 16 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. कंपनीचा दावा आहे कि एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ओलाचे टॉपचे व्हॅरिएन्ट तब्बल 579 किलोमीटर रेंज देऊ शकते. कंपनीने या बाइकमध्ये 4 रायडिंग मोड (हायपर, स्पोर्ट, नॉर्म आणि इको) आहेत. (Ola Electric Bike Launched)
ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी म्हंटल की, या सर्व बाईकचे बुकिंग अधिकृतपणे सुरू झाले आहे. हे कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून बुक केले जाऊ शकते. कंपनी रोडस्टर एक्स आणि रोडस्टरची डिलिव्हरी पुढील वर्षी जानेवारीपासून सुरू करण्याचा विचार करत आहे. तर, रोडस्टर प्रो साठी बुकिंग Q4 FY26 पासून सुरू होईल.