हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय बाजारात Ola या प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांच्या स्कुटर जास्त लोकप्रिय आहेत. बाजारात सर्वात जास्त इलेक्ट्रिक स्कुटर या ओलाच्या बघायला मिळतात. उत्कृष्ठ फीचर्स, दमदार रेंज आणि आकर्षक लूक या कारणांनी ग्राहकवर्ग ola च्या स्कुटर खरेदीला आपलं प्राधान्य देत आलाय. आता कंपनी सुद्धा आपल्या ग्राहकांना नवी भेट देणारा आहे… होय, Ola इलेक्ट्रिक आता इलेक्ट्रिक स्कूटर नंतर इलेक्ट्रिक बाईक लाँच (Ola Electric Bike) करण्याच्या तयारीत आहे. २०२६ मध्ये ओलाची इलेक्ट्रिक बाईक ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. ओला एकूण ४ इलेक्ट्रिक बाईक्स लाँच करणार आहे. डायमंडहेड, ॲडव्हेंचर, रोडस्टर आणि क्रूझर असं या चारही गाड्यांची नावे आहेत.
Ola ला ग्राहकांचा पाठिंबा- Ola Electric Bike
आम्ही 2026 च्या पहिल्या ६ महिन्यांत या मोटारसायकलींची डिलिव्हरी करण्याची आशा करत आहोत. आम्ही बाईक्ससह आमचा उत्पादन पोर्टफोलिओ वाढवण्याचा विचार करत आहोत असं कंपनीने म्हटले आहे. ओला इलेक्ट्रिकने नुकतेच तिच्या तीन मोटरसायकल आणि काढता येण्याजोग्या इलेक्ट्रिक बॅटरीच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये ओलाच्या स्कुटरचा तब्बल 30 टक्के हिस्सा आहे. यापूर्वी ग्राहकांनी ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला मोठा पाठिंबा दिला आहे, आता इलेक्ट्रिक बाईकला लोकांची पसंती मिळेल अशी आशा कंपनीला आहे. ओलाच्या या आगामी इलेक्ट्रिक बाईकमध्ये बॅटरी कपॅसिटी किती असेल, हि इलेकट्रीक बाईक किती किलोमीटर अंतर पार करेल याबाबत कोणतीही माहिती सध्या तरी समोर आलेली नाही. मात्र 2026 मध्ये लाँच होणाऱ्या इलेक्ट्रिक बाईकचे (Ola Electric Bike) डिझाइन त्यांच्या कॉन्सेप्ट व्हर्जनच्या डिझाइनप्रमाणेच राहण्याची शकयता आहे.
Ola च्या गाड्या बाजारात बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर्स आणि एथर स्कूटरशी स्पर्धा करतात. अथरने अलीकडेच फॅमिली स्कूटर रिझटा बाजारात आणली होती. दुसरीकडे Hero MotoCorp सुद्धा येत्या वर्षभरात इलेक्ट्रिक बाईक लाँच करण्याच्या विचारात आहे. हिरोच्या लाइन-अपमध्ये Vida श्रेणीतील ६ मॉडेल्सचा समावेश असू शकतो. याशिवाय झिरो मोटर्ससोबत पार्टनरशिप अंतर्गत हिरोचे ४ मॉडेल्सही बाजारात आणले जाऊ शकतात.