Ola Electric चा मोठा निर्णय!! तब्बल 1,441 स्कुटर परत मागवल्या; ‘हे’ आहे कारण

0
141
OLA SCOOTER
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इलेक्ट्रिक स्कुटरसाठी प्रसिद्ध असलेल्या ओला इलेक्ट्रिकने तब्बल 1,441 इलेक्ट्रिक दुचाकी गाड्या बाजारातून परत मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात २६ मार्चला ओलाच्या स्कुटरला आग लागली होती. त्या घटनेची चौकशी कंपनी करणार आहे तोपर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव ओलाने 1,441 इलेक्ट्रिक दुचाकी परत मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

या सर्व इलेक्ट्रिक गाड्यांचे टेस्टिंग पुन्हा एकदा कंपनी कडून करण्यात येईल.ओला चे इंजिनिअर गाडीची बॅटरी सिस्टीम, थर्मल सिस्टीमपासून सुरक्षा व्यवस्थेपर्यंत सर्व काही पुन्हा एकदा चेक  करतील असे कंपनीने सांगितले. कंपनीने दावा केला आहे की स्कुटरची बॅटरी सिस्टीम आधीपासूनच अनुरूप आहे आणि AIS 156 साठी टेस्टिंग केली गेली आहे. याशिवाय,गाडीची बॅटरी युरोपियन स्टॅंडर्ड ECE 136 च्या अंतर्गत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत या प्रकरणांच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे.

Okinawaआणि Pure ev नेही परत मागवल्या स्कूटर्स
अलीकडच्या काळात देशात अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्या बाजारातून त्यांची वाहने परत मागवत आहेत. ओकिनावा ऑटोटेकने बाजारातून 3,000 हून अधिक युनिट्स काढून घेतले आहेत. Pure EV ने देखील बाजारातून 2,000 युनिट्स काढून घेतले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here