दुर्दैवी ! पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वृद्धाला झोळी करून हॉस्पिटलला नेले मात्र वाटेतच झाला मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहे. ग्रामीण भागात सर्वसामान्यांचं जीवन विस्कळीत झालं आहे. अशातच हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये पुलावरून पुराचे वाहत असल्याने उपचाराअभावी वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या वृद्धाला उपचारासाठी झोळीत टाकून (old man was taken to the hospital in a bag) चिखल तुडवत नेण्यात आले मात्र वाटेतच या वृद्धाने आपला जीव सोडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पिंपरी खुर्द येथे पुलावर पुराचे पाणी आल्याने उपचाराअभावी एका वृद्ध रुग्णाचा (old man was taken to the hospital in a bag) दुर्दैवी मृत्यू झाला. संभाजीराव धांडे असे वृद्ध मृत व्यक्तीचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?
पिंपरी खुर्द या गावाजवळील ओढ्याला संततधार पावसामुळे पूर आला आणि पुराचे पाणी पुलावरून वाहू लागले. त्यामुळे पिंपरी खुर्द या गावातील आजारी वृद्धाला उपचारासाठी न्यायला उशीर झाला. पुलावर पुराचे पाणी असल्याने गावकऱ्यांनी अक्षरश: झोळी (old man was taken to the hospital in a bag) करून अर्धा किलोमीटर शेतातून चिखल तुडवत या वृद्ध रुग्णाला उपचारासाठी (old man was taken to the hospital in a bag) आखाडा बाळापुरकडे नेले. मात्र उपचाराला उशीर झाल्याने रस्त्यातच संभाजीराव धांडे यांचे निधन झाले.

यानंतर या गावकऱ्यांनी संभाजीराव धांडे यांचा मृतदेह अर्धा किलोमीटर (old man was taken to the hospital in a bag) अशाच प्रकारे झोळी करून चिखलातून पायपीट करत पुन्हा गावात आणला. पिंपरी खुर्द या गावाजवळचा हा पूल कमी उंचीचा असल्याने, पाऊस झाला की लगेच या पुलावर पुराचे पाणी येते. त्यामुळे गावकऱ्यांना नेहमीच अशा संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे हा पुल उंच करण्याची मागणी संतप्त गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर

Leave a Comment