धक्कादायक ! पुराच्या पाण्यात वृद्ध महिला गेली वाहून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामधील खळद येथील कौशल्या चंद्रकांत खळदकर वय – ७४ या कऱ्हा नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या असता पायाखालाचा दगड सटकल्याने त्या पुराच्या पाण्यात पडून वाहून गेल्या आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून प्रशासनाने नागरीकांनासतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

अकलूजमध्ये शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनी विवस्त्र करून दिला चोप ( पहा व्हिडीओ )

महिलांनी आरडाओरडा केल्याने ग्रामस्थ गोळा झाले. त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र त्या मिळून आल्या नाहीत. या प्रकरणी ग्रामस्थांनी सासवड पोलीस ठाणे तसेच पुरंदर तहसील कार्यालयाशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली आहे.

दरम्यान पुरंदरच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने गेल्या दोन दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ओढे , नाले आणि नद्यांना पूर आला आहे. या नदीतून सुमारे १००० क्यूसेक वेगाने पाणी सध्या प्रवाहित होत आहे. पोलीस व प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक, तसेच मुळशी तालुक्यातील खासगी आपत्ती व्यवस्थापन पथकाशी या प्रकरणी संपर्क साधला आहे. पथक येथे आल्याशिवाय वाहून गेलेल्या महिलेचा शोध लागणे अवघड बनले आहे. सादर कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कौशल्या खळदकर यांच्या मागे मोठा परिवार असून त्यांच्या अश्या जाण्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून त्यांच्या लवकरात लवकर शोध लावण्याची मागणी कुटुंबीय व ग्रामस्थांकडून होत आहे.