अवैध विक्रेत्याच्या दारूवर गस्तीवरील पोलिसाचाच डल्ला; पहा Video

औरंगाबाद : मद्यविक्रीवर निर्बंध घातल्यामुळे अनेक भागात अवैध दारू विक्री सुरू आहे. अवैध्य दारु विक्रि करणार्‍यांवर पोलीस कारवाई देखील करीत आहेत. मात्र औरंगाबाद शहरातील पुंडलीकनगर भागात पोलिसच अवैध विक्रेत्याकडून दारूची बाटली घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे गस्त घालत असतानाच हा प्रकार घडला. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे.

अवैध विक्री रोखण्याची जबाबदारी असलेलं पोलिसच असे कृत्य करीत असल्याने ‘दिव्याखालीच अंधार’ अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक भागात अवैध मधविक्री छुप्या पद्धतीने सुरू आहे.याला कुठलाही भाग अपवाद नाही. विक्रीवर निर्बंध असल्याने दुप्पट किमतीत दारूच्या बाटल्या विकल्या जात आहे.अशाच एका अवैध दारू विक्रेत्याकडून स्वतः पोलिसच दारू घेत असल्याचा धक्कादायक प्रकार आहे.

दिवसाढवळ्या खांद्यावर काळी बॅग घेऊन दोन तरुण पुंडलीक नगर भागात थांबतात, दरम्यान औरंगाबाद शहर पोलीस दलाची मोबाईल व्हॅन त्यांच्या जवळ येऊन थांबते, त्या वाहनातील चलकांच्या बाजूला बसलेला एक पोलीस कर्मचारी ज्याच्या डोक्याला पांढरा रुमाल, डोळ्यावर काळा चष्मा, आणि तोंडाला निळा मास्क लावलेला तो ऐटीत त्या दोन तरुणांना इशारा करतो, त्याच वेळी ते तरुण खांद्यावरील ती काळी बॅग काढतात.व त्यामधून एक मॅक्डोल व्हिस्की या कंपनीची दारूची बाटली काढतात. ती बाटली कर्तव्यावर असलेल्या त्या गस्तीवरील पोलिसाला देतात.पैशे न देताच तो पोलीस कर्मचारी ती दारूची बाटली अवैध विक्रेत्याकडून स्वीकारतो ही सर्व घटना कॅमेरेत कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशलमीडियावर व्हायरल होता आहे. हा 30 एप्रिलचा असल्याचे कळते, तर हा व्हिडिओ पुंडलीकनगर पोलीस ठाणे हद्दीतील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अवैध विक्रेत्याकडून दारू घेणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव मात्र दुपारपर्यंत समजू शकले नाही.

You might also like